माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ सध्या केबीसीचे १३वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन केबीसी १३मध्ये स्पर्धकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. दरम्यान, बुधवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये चक्क बिग बींनी एका स्पर्धकाला ‘तुम्ही इथून निघून जा’ असे म्हटले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या भागामध्ये लहान मुलांना बोलावण्यात आले होते. बुधवारच्या भागामध्ये हॉट सीटवर बसलेल्या अराधी गुप्ताने सर्वांची मने जिंकली आहेत. मोठा झाल्यावर टीव्ही पत्रकार बनण्याची इच्छा त्याने बिग बींसमोर व्यक्त केली होती. तसेच अमिताभ यांची मुलाखत घेण्याची विनंती त्याने केली आणि ती बिग बींनी पूर्ण देखील केली.
आणखी वाचा : हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

या मुलाखतीमध्ये अराधीने बिग बींना त्याच्या खासगी आयुष्याविषयी आणि कामाबद्दल अनेक प्रश्न विचारले. बिग बींनी देखील मनमोकळेपणाने त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, त्याने अॅलेक्सासोबत टायअपबद्दल देखील प्रश्न विचारला. ‘तुमचा आवाज अॅलेक्सासाठी रेकॉर्ड करण्यात आला आहे. म घरात जेव्हा जया काकू अॅलेक्सा एसी चालू कर असं म्हणतात तेव्हा अॅलेक्सा उत्तर देते की तुम्ही उत्तर देता’ असा मजेशीर प्रश्न विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर उत्तर देत बिग बींनी ‘मिस्टर टीव्ही जर्नलिस्ट, मला आता मुलाखत द्यायची नाही. तुम्ही कृपया इथून निघून जा. तुम्ही फार वेगळे प्रश्न विचारत आहात’ असे म्हटले. ते ऐकून सर्वांनाच हसू अनावर झाले.