बॉलीवूडचा ‘एलिजीबल बॅचलर’ असलेला रणबीर कपूर याच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्यांमुळे भारती मल्होत्रा चर्चेत आली आहे. मात्र, दिल्लीत रंगभूषाकार म्हणून कार्यरत असलेल्या भारतीने रणबीरसोबतच्या सर्व वृत्तांना धुडकावून टाकले आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारती म्हणाली की, मी रणबीरला डेट करत नाहीए. रणबीर किंवा त्याची बहिण रिदिमा यांनी मी कधी भेटलेसुद्धा नाही. मला याआधी याबाबत काहीच माहित नव्हते. माझ्या मैत्रिणीने जेव्हा मला फोन केला तेव्हा रणबीरसोबत माझे नाव जोडले गेल्याचे कळले. सुरुवातीला मला वाटले की माझी चेष्टा केली जातेयं. पण नंतर एका वृत्तवाहिनीद्वारे माझा रणबीरची ‘दिल्लीवाली गर्लफ्रेण्ड’ म्हणून प्रसार केला जात असल्याचे कळले. गेले काही दिवस माझ्याबद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवांमुळे मला खूप त्रास सहन करावा लागतोय, असे भारतीने म्हटले.
काही दिवसांपूर्वी रणबीरचा एका अज्ञात मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीरच्या आयुष्यात नवी मुलगी आल्याचे बोलले जात होते. रणबीरसोबत ही अज्ञात मुलगी आहे तरी कोण म्हणून बहुतेकांनी त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फेसबुकद्वारे ती मुलगी भारती असल्याचे कळले. तेव्हापासून रणबीर-भारतीच्या बातम्यांना उधाण आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2016 रोजी प्रकाशित
.. अखेर रणबीरची ‘दिल्लीवाली गर्लफ्रेण्ड’ बोलली!
रणबीरचा एका अज्ञात मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 23-05-2016 at 13:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is what ranbirs dilliwali girlfriend has to say about her relationship