सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक नावाजलेले चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. नुकताच चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून चित्रपट प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे.

आणखी वाचा : आलियाच्या पोस्टवर कमेंट करत ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं कौतुक केल्यामुळे अमृता खानविलकर झाली ट्रोल

पोस्टरमध्ये गुर्बानी गिलच्या हातात पत्र दिसत असून यात असलेला मजकूर वाचल्याने तिचा चेहरा इतका गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. याचा उलगडा जरी झालेला नसला तरी हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसतेय. ‘गुवाहटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘डिअर मॅाली’ला ‘बेस्ट फिचर फिल्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

hodi letters to dear molly, dear molly,
(Photo Credit : PR)

आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

चित्रपटसृष्टीला वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र आहिरे म्हणतात, “अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली होती. अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट एका सुंदर आणि हळव्या नात्यावर भाष्य करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. माझे बरेच चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित आहेत. मला चौकटीबाहेरचे विषयावर काम करायला विशेष आवडते.’’

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत. मनमोहन शेट्टी व गणेश जैन प्रस्तुत प्रवीण निश्चल प्रॅाडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माता प्रवीण निश्चल व रतन जैन आहेत. क्रिष्णा सोरेन यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणकाराची धुरा सांभाळली आहे.