रॉबर्ट डी निरो हे हॉलीवूडमधील एक प्रथितयश अभिनेते आहेत. जगभरात तर त्यांचे लाखो चाहते आहेतच, पण भारतातही त्यांना फॉलो करणारे बरेच लोक आहेत. हॉलीवूडमधील एक ताकदीचा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. रॉबर्ट डी निरो हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी सातव्यांदा बाप झाल्याने त्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे.

‘अबाऊट माय फादर’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रॉबर्ट डी निरो यांनी एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. ७९ वर्षाच्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने आपल्या सातव्या अपत्याला जन्म दिल्याचा खुलासा या मुलाखतीमध्ये केला आहे.

आणखी वाचा : क्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’चा नवा ट्रेलर प्रदर्शित; अणूबॉम्बच्या जन्माची अन् त्यानंतरच्या विध्वंसाची गोष्ट लवकरच उलगडणार

मुलाखतीमध्ये त्यांना सहाव्या मुलाबद्दल विचारणा झाल्यावर खुद्द रॉबर्ट यांनीच हे स्पष्ट केले की नुकतेच त्यांना पुन्हा पिता व्हायचे सौभाग्य लाभले आहे. याविषयी बोलताना रॉबर्ट डी निरो त्या मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला बरोबर माहिती देत म्हणाले, “खरे तर सातव्या मुलाबद्दल विचारू शकता, मला नुकतेच एक मूल झाले आहे.” रॉबर्ट डी निरो यांच्या या सातव्या मुलाची आई टिफनी चेन असू शकते असे म्हटले जात आहे. मध्यंतरी एका डिनर डेटदरम्यान तिने तिच्या बेबी बम्पचे फोटोज शेअर केले होते.

आणखी वाचा : अभिनयातून ब्रेक घेणारा आमिर खान अध्यात्माच्या वाटेवर? अभिनेत्याने गाठलं थेट नेपाळचं विपश्यना केंद्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉबर्ट डी निरो यांनी त्यांच्या या नव्या मुलाविषयी फारशी माहिती दिलेली नाही, पण त्यांच्या नजीकच्या लोकांनी या गोष्टीची पुष्टी केलेली आहे. १९७१ मध्ये रॉबर्ट डी निरो हे प्रथम वडील झाले जेव्हा त्यांनी आपल्या पूर्वपत्नीच्या मुलीला दत्तक घेतले. या दोघांना ४६ वर्षांचा एक मुलगादेखील आहे. रॉबर्ट डी निरो यांना त्यांच्या एक्स-गर्लफ्रेंडकडूनही दोन मुले आहेत. याबरोबरच पूर्वपत्नी ग्रेस हायटॉवरकडून राॅबर्ट डी निरो यांना एक मुलगा अन् एक मुलगी आहे.