प्रेक्षकांना चित्रपटगृहात घेऊन येण्यासाठी चित्रपटात इंटिमेट सीन मोठ्या प्रमाणात दाखवले जातात आणि ही काय नवीन गोष्ट नाही. मात्र, इंटिमेट सीन शूट करणं काहीवेळा अभिनेत्रींसाठी वेदनादायक ठरतं. पण चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार अभिनेत्री ते सीन शूट करतात. तर इंटिमेट सीन शूट करण्याविषयी हॉलिवूड चित्रपट ’50 शेड्स ऑफ ग्रे’ मध्ये अॅनास्टेसिया उर्फ अॅनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री डकोटा जॉन्सननेही भयानक अनुभव सांगितला आहे.

आणखी वाचा : “ढालेपाटलांच्या सूना काही ऐकना”; शिवानीने शेअर केला भन्नाट व्हिडीओ

डकोटा जॉन्सन १९९९ पासून हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करते. पण, २०१५ साली ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ या अमेरिकन एरॉटिक चित्रपटातून तिला जगभरात ओळख मिळाली. या चित्रपटात, तिने अॅनाची साकारली होती, एक अतिशय साधी मुलगी जी अब्जाधीश ख्रिश्चन ग्रे याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येते. ख्रिश्चन ग्रे तिच्यासोबत हिंसक पद्धतीने संबंध बनवत होता. या चित्रपटात ख्रिश्चन ग्रेची भूमिका जेमी डॉरनने साकारली होती.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

डकोटाने याआधी ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’मध्ये शूट केलेल्या सीनबद्दल तिचा अनुभव सांगितला होता. जेमीसोबत या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला खूप वेदना झाल्या. एका मुलाखती दरम्यान, डकोटाने या चित्रपटातील एका अतिशय इंटिमेट सीनबद्दल सांगितले आहे. जेमी तिला बेडवर फेकतो त्या सीनबद्दल सांगताना डकोटा म्हणाली, “जेमीने मला बेडवर फेकल्यानंतर चाबकाने मारले. ते भयानक होते आणि या सीनचे १७ टेक दिले होते. तर जेमी तिला सतत बेडवर फेकत होता म्हणून तिचं डोके दुखत होतं. शेवटी तिची अवस्था अशी झाली होती की तिला मान हलवताही येत नव्हती.”

आणखी वाचा : धनंजय मानेच्या नावाने मीम्सचं पेज चालवणाऱ्याची अशोक सराफांनी घेतली शाळा, फोटो शेअर करत; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डकोटा याच चित्रपटातील आणखी एका सीनबद्दल सांगताना पुढे म्हणाली, “एकदा आम्ही स्वयंपाकघरात एक सीन शूट करत होतो आणि मला कपाटात लपून बसावे लागणार होते. मी ते कपाट हँडलने आतल्या बाजुला खेचले, पण ते कॅबिनेट नसून सेटचा एक भाग होता आणि तो संपर्ण सेट माझ्या डोक्यावर पडला. तर बऱ्याचवेळा इंटिमेट सीन शूट केल्यानंतर मी सरळ सेटच्या बाहेर जायचे.” डकोटाने २०१७ मध्ये ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ आणि २०१८ मध्ये ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’च्या सिक्वेलमध्ये अॅनाची भूमिका साकारली होती.