Housefull 5 Box Office Collection Day 14 : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. हाऊसफुल फ्रँचायझीचा हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट ६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुखसारखे कलाकार या मल्टीस्टारर चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. सर्वांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
या चित्रपटाला समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज चित्रपट प्रदर्शित होऊन १४ दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत आता गुरुवारी ‘हाऊसफुल ५’चे आकडे समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया आतापर्यंत त्याने किती कमाई केली आहे?
‘हाऊसफुल ५’च्या कमाईत घट
‘हाऊसफुल ५’मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्यासह संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, सौंदर्या शर्मा, चित्रांगदा सिंग, डिनो मोरिया आणि नर्गिस फाखरी हे कलाकार आहेत. ‘हाऊसफुल ५’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ती दररोज कमी होत असल्याचे दिसून येते. हाऊसफुल ५ ने पहिल्या दिवशी २४ कोटी रुपयांची कमाई केली.
आता त्याचे गुरुवारचे कलेक्शन आले आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, ‘हाऊसफुल ५’ ने १४ व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २.६५ कोटी रुपये कलेक्शन केले. आता त्याचे एकूण कलेक्शन १६७.९० कोटी रुपये झाले आहे. त्याचे कलेक्शन आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
बॉक्स ऑफिसवर २४ कोटींनी सुरुवात करणाऱ्या ‘हाऊसफुल ५’ने पहिल्या आठवड्यात १२७.२५ कोटींची कमाई केली, पण दुसऱ्या शनिवार आणि रविवारनंतर चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे. १४ दिवसांनंतर, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता १६७.९० कोटींवर पोहोचले आहे. चित्रपट अजूनही त्याच्या बजेटपासून खूप दूर आहे. चित्रपटाचे बजेट २२५-२३० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
‘हाऊसफुल ५’ ही बॉलीवूडमधील पहिली पाच चित्रपटांची फ्रँचायझी आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. बॉक्स ऑफिसवर १६७ कोटींपेक्षा जास्त कमाई करूनही ‘हाऊसफुल ५’ त्याचे बजेट वसूल करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जर चित्रपट त्याचे बजेट वसूल करू शकला नाही, तर तो सुपरहिटच्या श्रेणीतही समाविष्ट होणार नाही.