बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सबा आझादसोबत त्याच्या अफेअरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. याशिवाय हे दोघंही एकमेकांसाठी सोशल मीडियावरही पोस्ट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच हृतिकनं सबासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता आजारी असलेल्या सबाची हृतिक रोशन काळजी घेताना दिसत आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी सबा हृतिकच्या कुटुंबीयांसोबत लंच करतानाही दिसली होती. त्यानंतर आता सबा आझादनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात आजारी असलेल्या सबा आझादची हृतिक रोशन आणि त्याचं कुटुंब काळजी घेत असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा- ‘ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे’, मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज

काही दिवसांपासून सबा आझाद आजारी आहे. अशात हृतिक आणि त्याचे कुटुंबीय काळजी घेत आहेत. हृतिकच्या कुटुंबीयांनी सबासाठी जेवण पाठवलं होतं. ज्याचे फोटो सबानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, ‘जेव्हा तुम्ही आजारी असता. तेव्हा तुम्हाला जेवण देण्यासाठी बेस्ट माणसं असतात.’ या आपल्या पोस्टमध्ये सबानं कंचन रोशन, पशमीना रोशन यांना टॅग केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधी हृतिक रोशननं त्याच्या इन्स्टाग्राम सबा आझादसाठी एक पोस्ट लिहिली होती. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. सबाच्या आगामी शोसाठी त्यानं या पोस्टमधून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टमध्ये सबा आझादसोबत नसीरुद्दीन शहा यांचा मुलगा इमाद देखील होता.