बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हृतिकचं नाव अभिनेत्री सबा आझादसोबत जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघं डिनर डेटनंतर एकमेकांच्या हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडत असताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर या दोघांच्या नात्याच्या चर्चां सोशल मीडियावर होऊ लागल्या होत्या. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच सबा हृतिकच्या कुटुंबीयांसोबत लंचसाठी गेलेलीही पाहायला मिळाली.

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या फॅमिली लंचनंतर हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. अशात आता हृतिकनं सबासाठी लिहिलेली इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सबा आझाद आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड इमाद शाह यांचं एक पोस्टर शेअर केलं आहे.

आणखी वाचा- Ukraine Russia war : सोनू सूदला वाटतेय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता, म्हणाला…

हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेलं हे पोस्टर सबा आणि इमाद यांचा बॅन्ड ‘मॅडबॉय- मिंक’चं पोस्टर आहे. हा एक इलेक्ट्रो-फंक बॅन्ड आहे आणि या बॅन्डसोबत सबा आणि इमाद पुण्यात परफॉर्मन्स करणार आहेत. हा फोटो शेअर करताना हृतिकनं लिहिलं, ‘किल इट मित्रांनो.’ हृतिक आणि सबा यांच्या नात्याच्या चर्चांना सुरुवात झाल्यानंतर हृतिकनं पहिल्यांदाच सबासाठी अशाप्रकारची पोस्ट लिहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दीपिका आणि हृतिक मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. तर सबा आझाद अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट बॉइज’ वेब सीरिजमध्ये दिसली होती.