अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. १४ जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनी पिंकी रोशन यांनी इन्स्टाग्रामवर सुशांतच्या फोटोसोबत एक पोस्ट लिहिली आहे.

‘प्रत्येकाला सत्य हवंय पण कुणालाही प्रामाणिक राहायचं नाहीये’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली. सोबतच सुशांतचा फोटोसुद्धा त्यांनी पोस्ट केला. #prayersarepowerful #universeispowerful असे हॅशटॅगसुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये वापरले.

आणखी वाचा : बिग बॉसच्या स्पर्धकांना दर आठवड्याला मिळतं इतकं मानधन; ‘ही’ अभिनेत्री करते सर्वाधिक कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीतील बरेच वादविवादसुद्धा समोर आले. घराणेशाही, गटबाजी या मुद्द्यांवर अनेक कलाकार समोर येऊन मोकळेपणाने बोलून लागले. त्यानंतर ड्रग्जचाही मुद्दा समोर आला. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. सध्या रिया जामिनावर सुटली आहे.