scorecardresearch

तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

हृतिकची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…
हृतिक सध्या भाडे तत्वावर राहत आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिकचे लाखो चाहते आहेत. हृतिक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हृतिक चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच हृतिकने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत हृतिक त्याच्या आईसोबत दिसत आहे. हृतिकने हा एक मिरर सेल्फी शेअर केली आहे. यात हृतिक बसल्याचे दिसत आहे, तर त्याची आई बाल्कनित असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘आईबरोबर नाश्त्याचा आनंद घेत आहे. बुधवारची सकाळ ही रविवारच्या सकाळसारखी वाटतेय. आता जा आणि तुमच्या आईला मिठी मारा’, अशा आशयाचे कॅप्शन हृतिकने दिले आहे.

आणखी वाचा : मुलाच्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाची खास पोस्ट, म्हणाली..

hrithik roshan, hrithik roshan troll,
हृतिकच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ३ वर्षांची असताना लैंगिक शोषण ते कास्टिंग काऊच, फातिमा सना शेखने केला होता धक्कादायक खुलासा

हृतिकने एवढी छान पोस्ट केली असली तरी नेटकऱ्यांचे लक्ष हे फोटोत दिसत असलेल्या भिंतीचा रंग निघाल्याकडे गेले आहे. एका नेटकऱ्याने ‘लक्ष देऊन पाहा हृतिक रोशनच्या घराचा रंग पावसामुळे गेला आहे’, अशी कमेंट केली. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘माझ्यात आणि डुग्गू दादामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे माझ्या आणि त्याच्या गॅलरीच्या भिंतीचा रंग पावसाच्या पाण्याने निघाला आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुमच्या घरात देखील भिंतीवरचा रंग पावसामुळे निघतो’, अशा अनेक कमेंच नेटकऱ्यांनी हृतिकच्या त्या पोस्टवर केल्या आहेत. यापैकी एका नेटकऱ्याला हृतिकने उत्तर दिले आहे. ‘अहो हे घर भाडे तत्वावर आहे….. लवकरच स्वत:चं घर घेईन… आणि भिंतीवरचा रंग निघाला नसेल तर त्या ठीक करुन घेण्यात कसली मजा?’ असे म्हणतं हृतिकने एका नेटकऱ्याला मजेशीर उत्तर दिले आहे. तर हृतिक सध्या भाडे तत्वावर राहत असून तो दरमहिन्याल्या ८ लाख २५ हजार रुपये भाडे देत असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2021 at 17:51 IST

संबंधित बातम्या