तोतरेपणाची खिल्ली उडवणाऱ्यांवर अभिनेता हृतिक रोशन भडकला. ट्विटरच्या माध्यमातून त्याने हा राग व्यक्त केला. एका महिलेने त्याच्या भावाविषयी ट्विट केलं होतं. तोतरेपणामुळे शिक्षकाने त्याला वर्गात ओरडल्याची घटना त्या महिलेनं या ट्विटमध्ये सांगितली. या ट्विटला उत्तर देत ‘ती लोकं अक्कलशून्य माकडं आहेत’ अशा शब्दांत हृतिकने सुनावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या भावाची व्यथा सांगत महिलेनं ट्विटरवर लिहिलं, ‘तोतरेपणामुळे माझा भाऊ कॉलेजमध्ये प्रेझेन्टेशन देत असताना अडखळत होता. हे पाहून शिक्षकाने त्याला सुनावलं, की जर नीट बोलता येत नसेल तर तू शिक्षणच नाही घेतलं पाहिजे. वर्गात सर्व विद्यार्थांसमोर त्याचा अपमान केला. या घटनेनंतर तो त्याच्या रुममधून बाहेर पडलाच नाहीये.’ या ट्विटला हृतिकने उत्तर दिलं. ‘तुम्ही तुमच्या भावाला सांगा की तो शिक्षक आणि त्याने मांडलेलं मत याचा काहीच संबंध नाही. मोठी स्वप्न पाहण्यासाठी तोतरेपणा कधीच तुम्हाला थांबवू शकत नाहीत. त्याला सांगा की यात त्याचा काहीच दोष नाही आणि त्या गोष्टीची लाजही बाळगू नये. जे लोक त्यावरून चिडवतात ती अक्कलशून्य माकडं आहेत.’

आणखी वाचा : बूट पॉलिश करणाऱ्या सनी हिंदुस्तानीने जिंकला ‘इंडियन आयडॉल’चा किताब

हृतिक रोशनलाही लहानपणी तोतरेपणाचा त्रास होता. यावर मात करण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. आजही तो आपल्या आवाजासाठी रोज मेहनत घेतो. विशेष म्हणजे हृतिकनं हे जाहिररीत्या कबूल केलं आहे. तसंच तोतरेपणावर मात करण्याच्या प्रकल्पांसाठी हृतिक रोशन सढळ हातानं आर्थिक मदत करत असतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan slams teacher who bullied student for a stutter ssv
First published on: 24-02-2020 at 12:29 IST