अभिनेता हृतिक रोशन हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या हृतिक हा त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘विक्रम वेधा’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या ‘पुष्कर-गायत्री’ या दिग्दर्शक जोडीने तेच नाव वापरुन या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर, टीझर आणि पोस्टरचे कौतुक केले जात आहे. हृतिकचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच हृतिकसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृतिक रोशन हा नुकतंच ब्रह्मास्त्र हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची दोन्हीही मुलंही उपस्थित होती. चित्रपट पाहिल्यानंतर तो त्याच्या मुलांसह गाडी बसण्यासाठी जात होता. त्यावेळी एका चाहत्याने जबरदस्ती त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. या अतिउत्साही चाहत्याचा हा प्रकार पाहून हृतिक रोशन चांगलाच संतापला.

आणखी वाचा : जबरदस्त बॉडी अन् बायसेप्स, हृतिकचा ‘फायटर’ लूक पाहिलात का?

यानंतर हृतिकने ‘त्या चाहत्याला काय करतो आहेस, तुला समजतं का???’ असे रागाच्या स्वरात विचारले. त्यानंतर हृतिक हा रागारागात गाडीत बसून निघून गेला. त्याचा हा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात काही जण हृतिकला ट्रोल करताना पाहायला मिळत आहे. तर काहींनी त्या चाहत्याच्या चूक असल्याचे म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘वॉर’ या चित्रपटानंतर तब्बल तीन वर्षानंतर हृतिक ऑनस्क्रीन दिसणार आहे. विक्रम वेधा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तमिळ ‘विक्रम वेधा’मध्ये आर. माधवन आणि विजय सेतुपती यांनी काम केले होते.