बॉलिवूडमधील पिळदार शरीरयष्टीच्या अभिनेत्याप्रमाणे आपलीसुद्धा शरीरयष्टी असावी, असे त्यांच्या अनेक युवा चाहत्यांना वाटते. याबाबतीत चाहत्यांमध्ये सर्वात आघाडीवर आहे तो ‘क्रिश’ चित्रपटाचा अभिनेता आणि बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन. फिटनेससाठी सुपरिचीत असलेला हृतिक केवळ चाहत्यांसाठीच प्रेरणादायी नसून, पिळदार शरीरयष्टी कायम राखण्यासाठीचे हृतिकचे समर्पण पाहून शाहरूख खानलादेखील प्रेरणा मिळाली.
हृतिकने व्यायाम करतानाचे आपले छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. छायाचित्राबरोबर लिहिलेल्या ओळींमध्ये तो म्हणतो, व्यायामाची वेळ. रात्र, बाहेर पाऊस पडत आहे आणि मी जिममध्ये घाम गाळतोय. तुमचे मानसिक चित्त आणि घडाळ्याला तुमच्या कामाच्या आणि व्यायामाच्यामध्ये येऊ देऊ नका. अंगात शिस्त बाणा, सर्व ठीक होईल.
हृतिकच्या या संदेशावर “@Hrithik आता मी सुद्धा सुरुवात करणार… तुझ्याकडून प्रेरणा मिळाली!!!” अशी शाहरूखने प्रतिक्रिया दिली.
बॉलिवूडकर केवळ हृतिकच्या शिस्तबद्ध वागण्याचे चाहते नसून, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर आणि रितेश देशमुखसारख्या बी-टाऊनमधील कलाकारांनी ‘बँग बँग’ चित्रपटाच्या टिझरमध्ये दाखविण्यात आलेले हृतिकचे थरारक स्टंट आणि त्याच्या पिळदार शरीरयष्टीचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘बँग बँग’ चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
हृतिकच्या शिस्तीतून शाहरूखला प्रेरणा
बॉलिवूडमधील पिळदार शरीरयष्टीच्या अभिनेत्याप्रमाणे आपलीसुद्धा शरीरयष्टी असावी, असे त्यांच्या अनेक युवा चाहत्यांना वाटते.
First published on: 12-08-2014 at 02:43 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinemaहृतिक रोशनHrithik Roshan
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshans discipline inspires shah rukh khan