हृता दुर्गुळे पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ मालिकेत

या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

hruta durgule, hruta durgule upcoming serial, man udu udu lagl,

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने तमाम प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. ती अक्षरशः तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. ती कोणत्या मालिकेत पुन्हा दिसणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते.

झी मराठीवर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. तो पाहून प्रेक्षक आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. या मालिकेतून अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

आणखी वाचा : ‘सोहाला किस करताना सैफ अली खान मला…’, आर माधवनने सांगितला ‘रंग दे बसंती’मधील किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘मन उडू उडू झालं’ असं या मालिकेचं नाव असून ही मालिका ३० ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. हृताने या मालिकेचा टीझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करत ‘कमिंग बॅक होम वाली फिलिंग’ असं म्हंटल.

पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिका करताना हृताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हृता या मालिकेत एक वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. तिचा प्रोमोमधील लुक पाहून फक्त मालिकेतला नायकच नाही तर तमाम महाराष्ट्राचं घायाळ झाला आहे यात शंकाच नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hruta durgule upcomig new serial avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या