बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहना शेट्टीने ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण अहानच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. अहानच्या पहिल्या चित्रपटानंतर प्रतिक्रिया देताना वडील सुनील शेट्टी हे भावूक झाले. तसेच यावेळी त्यांनी काही गोष्टींचा खुलासाही केला.

अहान शेट्टीचा तडप हा पहिला चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. याच पार्श्वभूमीवर अहानचे वडिल अभिनेता सुनिल शेट्टी याला प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “मी गेल्या २१ दिवसांपासून अजिबात झोपलेलो नाही. मला फार काळजी वाटत होती. मात्र माझी पत्नी माना आणि अहान हा चित्रपट प्रदर्शनच्या आदल्या दिवशी छान झोपले होते. पण जेव्हा हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले तेव्हापासून मला झोप लागली नाही.”

“मी फार अस्वस्थ आणि घाबरलो होतो. मात्र करोना काळात प्रेक्षकांनी अहानला स्विकारावे इतकी माझी अपेक्षा होती. त्याला लोकांचे प्रेम मिळावे, असेही मला वाटत होते,” असेही सुनील शेट्टीने सांगितले.

हेही वाचा : “चांगला अभिनेता नाही झालास तरी चालेल पण….”, सुनील शेट्टीच्या मुलाचा वडिलांबद्दल खुलासा

यावेळी सुनील शेट्टीला चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल विचारले असता तो म्हणाला, “चित्रपटाचा रिव्ह्यू हा फार महत्त्वाचा असतो. ते एखादे वैयक्तिक मत असते. तुमचे मित्र हे तुमच्याबद्दल चांगले बोलतात मात्र खरं सत्य हे फक्त इतरच तुम्हाला सांगतील. सध्या अहानच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र तरीही प्रेक्षकांनी अहानचा स्विकार करावा याची वाट बघत आहे,” असे त्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा ‘तडप’ हा चित्रपट तेलुगू ‘आरएक्स १००’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अहानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘तडप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलान लुथारियाने केले आहे. तर चित्रपटाची कथा रजत अरोराने लिहिली आहे. या चित्रपटात अहान शेट्टीने काही इंटिमेट सीन्स दिल्यामुळे चित्रपट चर्चेत होता.