scorecardresearch

आई श्वेता तिवारीनंतर आता पलक तिवारीचा Video झाला Viral; सैफ अली खानचा मुलगाही तिच्यावर संतापला

एका व्हायरल व्हिडीओमधील पलकच्य त्या कृतीमुळे या दोघांचं नातं संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे.

palak tiwari ibrahim ali khan
या दोघांची जोडी फारच चर्चेत आहे. (Image: Instagram/@varindertchawla)

“माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे” या वक्तव्यामुळे चर्चेत आलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) वादात सापडली. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान तिने ब्रा साईज आणि देव याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर माफी मागत प्रकरणावर पडदा टाकला आहे. मात्र आता एका व्हायरल व्हिडीओमुळे श्वेताची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या चर्चेमागील कारण आहे अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान.

तशी पलक आणि इब्राहिम (Ibrahim Ali Khan) यांची जोडी मागील बऱ्याच काळापासून पेज थ्रीवर चर्चेत आहे. हे दोघे मुंबईतील एका रेस्तराँबाहेर एकत्र दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचे व्हिडीओ आणि नात्याबद्दलच्या तुफान चर्चा रंगल्यात. नक्की या दोघांमध्ये काय सुरु आहे, दोघे एकमेकांना डेट करतायत का अशा अनेक शंका नेटकऱ्यांनी उपस्थित केल्यात. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने दोघांच्या नात्यामध्ये अंतर आल्याचं सांगितलं जात आहे. पलक तिवारीच्या एका कृतीमुळे इब्राहिम अली खान दुखावला गेलाय. इब्राहिमला पलकने कॅमेरासमोर केलेली एक कृती अजिबात आवडलेली नाहीय.

मुंबईतील रेस्तराँबाहेर पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांची गाडी दिसली तेव्हा पलक फोटोग्राफर्सपासून चेहरा लपवत होती. मात्र दुसरीकडे तिच्या बाजूला बसलेला इब्राहिम अली खान मात्र फोटोग्राफर्सकडे हसून पाहत होता. बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार पलकच्या याच कृतीमुळे इब्राहिमला फार नाराज झालाय. त्याला पलकही ही कृती फारच बालीश वाटली असून यामुळे तो तिच्यावर नाराज झालाय.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा यानंतर झालेली नाही. सर्व काही संपलंय असं आताच म्हणणं फार घाई केल्यासारखं होईल, ते दोघे फार चांगले मित्र आहेत. दोघंही एकमेकांना आवडतात. मात्र सध्या ते एकमेकांशी बोलत नसल्याचं सुत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय.

हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याच्या व्हिडीओतमध्ये पलक झळकली होती. त्यानंतर ती रातोरात स्टार झालीय. पलक सध्या तिच्या आगामी ‘रोजी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. ‘रोजी’ हा एक भयपट असल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुग्राममधील एका बीपीओ कंपनीत काम करणारी रोजी नावाची महिला कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याच्या सत्य घटनेवर या चित्रपटाचं कथानक आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे इब्राहिम सध्या करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटामध्ये सहाय्यक निर्देशक म्हणून काम करत आहे. इब्राहिम हा सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ibrahim ali khan is embarrassed finds palak tiwari hiding her face in viral video childish scsg

ताज्या बातम्या