बॉक्सऑफीसवर सध्या धुमाकूळ घालणाऱया ‘पीके’ चित्रपटाचा दुसरा भाग तयार करायचा झाल्यास त्यामध्येही काम करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया अभिनेता आमिर खानने दिली. ‘पीके’च्या सिक्वलबद्दल विचारले असता आमिर म्हणाला की, “चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘पीके’चा दुसरा भाग तयार करणार असतील, तर त्यामध्येही काम करण्यास मला आवडेल. त्यामुळे हा प्रश्न खरंतर हिरानी यांना विचारायला हवा.” चित्रपटाच्या ‘क्लायमॅक्स’मध्ये आमिर खानसोबत अभिनेता रणबीर कपूर दाखविण्यात आला आहे. यावरून रणबीर कपूरला घेऊन राजकुमार हिरानी ‘पीके’चा सिक्वल देखील येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आमिरची मुख्य भूमिका असलेल्या ‘पीके’ चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत तिकीटबारीवर चांगलाच गल्ला जमवला आहे. चित्रपटाला चांगली पसंती मिळत असून रेकॉर्डब्रेक कमाईकडे चित्रपट वाटचाल करत आहे. आमिरने देखील चित्रपटाला मिळणाऱया प्रतिसादावर समाधान व्यक्त केले असून मानवता हाच सर्वांत महत्त्वपूर्ण संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. धार्मिक भेदाभेद न बाळगता विश्वास व श्रद्धा हेच आपल्या आयुष्याचे महत्त्वपूर्ण घटक असणे, हाच खरा संदेश असल्याचेही आमिर म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2014 रोजी प्रकाशित
‘पीके’चा सिक्वल करायला आवडेल- आमिर खान
बॉक्सऑफीसवर सध्या धुमाकूळ घालणाऱया 'पीके' चित्रपटाचा दुसरा भाग तयार करायचा झाल्यास त्यामध्येही काम करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया अभिनेता आमिर खानने दिली.

First published on: 23-12-2014 at 03:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Id love to do pk sequel aamir khan