Salman Khan Video : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने २०२५ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट) सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी अभिनेत्याने एक ब्लॅक अँड व्हाइट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो देशभक्तिपर गाणे गाऊन हा दिवस साजरा करताना दिसत आहे.
१५ ऑगस्ट रोजी सलमान खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ‘किक’ आणि ‘हिरो’ सारख्या अनेक चित्रपटांना आवाज देणाऱ्या सलमान खानने ‘सारे जहाँ से अच्छा’ हे देशभक्तिपर गाणे गाऊन आपला आनंद व्यक्त केला.
या व्हिडीओमध्ये तो भावनिक दिसत आहे, ज्याच्या शेवटी त्याने प्रथम हात जोडून देशवासीयांना नमस्कार केला. त्याने सोशल मीडियावर भारताच्या तिरंग्याच्या इमोजीसह ‘स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा’ असे लिहिले आहे.
चित्रपट निर्माते कबीर खान यांनी अलीकडेच सलमान आणि कतरिना अभिनीत त्यांच्या ‘एक था टायगर’ या अॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटाला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपट निर्मात्याने एक भावनिक पोस्ट लिहिली होती आणि चाहत्यांना सेटवरील काही पडद्यामागील छायाचित्रे दाखवली. त्यांनी आयकॉनिक YRF फ्रँचायझीची सुरुवात कशी झाली हे सांगितले.
सलमान खान आणि आमिर खान अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या चॅट शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. सलमानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर तो त्याचा पुढील चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ची तयारी करत आहे. हा चित्रपट गलवान खोऱ्याजवळील भारतीय आणि चिनी सैनिकांमधील संघर्षावर आधारित आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये चित्रांगदा सिंगची मुख्य भूमिका आहे, हा सलमानबरोबरचा तिचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज यांचाही समावेश आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट आहे. सलमान यापूर्वी रश्मिका मंदानाबरोबर ‘सिकंदर’मध्ये दिसला होता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही.
सलमान खान ‘बिग बॉस १९’ मुळे देखील चर्चेत आहे. ‘बिग बॉस’चं हे नवं पर्व २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाचं सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे.