जपानी उद्योगपती युसाकू मेझावा यांनी नुकतंच चंद्राच्या सफरीची घोषणा केली आहे. या सहलीसाठी काही जणांना निवडण्यात आलं आहे. त्यांनी शुक्रवारी आठ क्रू सदस्यांची नावे जाहीर केली, जे एलॉन मस्कच्या स्पेस एक्स रॉकेटमधून पुढील वर्षी यात सामील होतील. अभिमानाची गोष्ट अशी की यामध्ये एका भारतीय कलाकाराचाही समावेश आहे.

हा भारतीय कलाकार म्हणजे अभिनेता देव जोशी. एलॉन मस्कच्या स्पेस एक्स रॉकेट्समधून अमेरिकन डीजे आणि निर्माता स्टीव्ह ऑकी, अमेरिकन युट्युबर टीम डॉड, झेक कलाकार येमी एडी, आयर्लंडची फोटोग्राफर रिहाना अ‍ॅडम, ब्रिटीश फोटोग्राफर करिम लिया, अमेरिकन फिल्ममेकर ब्रेंडन हॉल, साऊथ कोरियन संगीतकार टॉप आणि भारतीय अभिनेता देव जोशी हे चंद्राच्या सफारीला जाणार आहेत.

आणखी वाचा : राणादा-पाठक बाईंपाठोपाठ ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, म्हणाली…

देव जोशीला घराघरात बालवीर म्हणून ओळखलं जातं. तो याच नावाच्या मालिकेतही लोकप्रिय झाला होता. देवने २०हून अधिक गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘चंद्रशेखर’ या मालिकेत चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती.

हेही वाचा : रणबीर कपूरला सतावते भविष्याची काळजी, लेकीचा उल्लेख करत म्हणाला, “ती २० वर्षांची होईल तेव्हा मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेझावा यांनी या प्रवासासाठी स्पेस एक्स रॉकेटमधली प्रत्येक जागा खरेदी केली आहे. स्पेस एक्सच्या या रॉकेटला लाँच झाल्यापासून पृथ्वीवर परतण्यासाठी आठ दिवस लागतील. हे यान चंद्राच्या तीन फेऱ्या पूर्ण करेल. २०२३ मध्ये या फेरीचं नियोजन करण्यात आलं आहे, पण या यानाच्या चाचण्या होत असल्याने नियोजनात बदल होऊ शकतो. २०१८ पासून हे रॉकेट कार्यरत आहे. मेझावा यांनी ट्वीटरवरुन याची घोषणा केली असून त्यांच्या #dearMoon प्रोजेक्टसाठी करण्यात आलेल्या वेबसाईटवरुनही त्यांनी ही माहिती दिली आहे.