देशातील सर्वात जास्त लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ठरलेल्या इंडियन आयडला ग्रॅण्ड फिनाले सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. या शोमध्ये कुणाच्या डोक्यावर विजेत्याचं मुकुट सजणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. या शोमधला विजेता कोण असणार हे आज कळणारेय. अशातच या शोमधील स्पर्धक पवनदीप राजन गेल्या अनेक दिवसांपासूव चर्चेत येतोय. नुकताच त्याचा एक फोटो प्रचंड व्हायरल झालाय. या फोटोमध्ये पवनदीप राजनने त्याच्या हातात इंडियन आयडल १२ ची ट्रॉफी आणि २५ लाखांचा चेक दिसून येतोय. पवनदीप राजनच्या या व्हायरल फोटोमुळे प्रत्येक जण हैराण झालाय.

इंडियन आयडल १२ च्या ग्रॅण्ड फिनाले जस जसा जवळ येऊ लागलाय तस तसं पवनदीप राजनच या शोमध्ये विजेता होणार, असा अंदाज लावण्यास सुरूवात झालीय. अशातच सध्या त्याचा व्हायरल झालेल्या फोटोमुळे तर त्यावर अनेकांची तर खात्रीच झाली आहे. त्याच्या व्हायरल फोटोनंतर वेगवेगळे गैरसमज निर्माण होण्यास सुरूवात झालीय. परंतू पवनदीप राजन याचा हा व्हायरल फोटो पूर्णपणे खोटा असल्याचं सांगण्यात येतंय. या फोटोला बाकाईने निरखून पाहिल्यानंतर दिसेल की, त्याच्या हातातल्या २५ लाख रूपयेच्या चेकवर जी तारीख दिली आहे ती १५ मे २०२१ अशी आहे. त्यानंतर अनेकांनी हा फोटो खोटा असल्याचं सांगितलं.

पवनदीप राजन याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी वेगवेगळे कमेंट्स देण्यास सुरूवात केलीय. “अशा प्रकारचा फोटो पोस्ट करण्यात काही अर्थ नाही”, “आम्हाला सगळ्यांना माहितेय की १५ ऑगस्ट रोजी या इंडियन आयडल १२ चा ग्रॅण्ड फिनाले सुरू होणारेय. त्यामूळे असे फोटो पाहून आम्हाला कोणती उत्सुकता वाटत नाही.”, अशा वेगवेगळ्या कमेंट्स या व्हायरल फोटोवर दिसून येत आहेत.

आणखी वाचा: Adnan Sami Birthday: ‘लिफ्ट करा दे’ फेम सिंगर अदनान सामी यांच्याबद्दल खास गोष्टी

तर दुसरीकडे पवनदीप राजन हाच इंडियन आयडल १२ विजेता ठरणार, असा दावा त्याचे फॅन्स करताना दिसून येत आहेत. परंतू खरा निकाल येण्यासाठी आता काही तासांचाच कालावधी शिल्लक असल्याने लवकरच इंडियन आयडल १२ चा विजेता आपल्यासमोर असणार आहे. यंदाच्या सीजनचा ग्रॅण्ड फिनाले हा तब्बल १२ तास सुरू असणार आहे. या शो च्या ग्रॅण्ड फिनालेसाठी प्रेक्षक देखील बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. या शो मध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, शन्मुख प्रिया, सायली कांबळे, निहाल तारो आणि मोहम्मद दानिश या टॉप सहा स्पर्धकांमध्ये चुरस पहायला मिळणार आहे. त्यामूळे आता या टॉप सहा स्पर्धकांमध्ये कुणाच्या डोक्यावर इंडियन आयडल १२ च्या विजेत्याचं मुकूट चढणार हे, पाहणं आता औत्सुक्याचं ठरणारेय.