छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादाग्रस्त असा रिअॅलीटी शो ‘इंडिय आयडल १२’, गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे हा शो चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अमित कुमार यांनी असा दावा केला होता की शोच्या निर्मात्यांनी त्यांना स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते. तर, दुसरीकडे पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने निर्मात्यांना गुणांपेक्षा गरिबी दाखवण्यात जास्त इंट्रेस्ट आहे, असे म्हटले होते. बऱ्याच नेटकऱ्यांनी हे पाहिल्यानंतर शोवर टीका करण्यास सुरुवात केली. सध्या ‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी शोवर सोशल मीडियावर अनेक मीम्स हे व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, या वेळी शोचे परीक्षक नेहा कक्कड, हिमेश रेशमीया, विशाल दादलानी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळाले की…

एखादा स्पर्धक त्याच्या गरीबी विषयी किंवा त्याच्या दु:खा बद्दल बोलतो तेव्हा हे परीक्षक लगेच रडू लागतात असे  म्हणतं अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. नेहा कक्कर आणि हिमेश रेशमीया हे दोघे ही कोणाची काही कथा ऐकली की भावूक होतात. त्यांच्या या भावूक होण्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : ‘केआरके कुत्ता है’ गाण्यावरुन वाद, कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक नेटकरी म्हणाला, “जेव्हा एखादा स्पर्धक त्याच्या कुटुंबा विषयी काही सांगायला सुरुवात करतो आणि समजा परीक्षक रडले नाहीत. तर प्रेक्षकांना आश्चर्य वाटते की यांना यावेळी रडू आलं नाही.” दुसरा नेटकरी म्हणाला, “परीक्षक आणि स्पर्धकाला रडताना पाहून प्रेक्षक म्हणतात काय मस्त अभिनय करतात.” तर, आणखी एक नेटकरी म्हणाला, “प्रत्येकवेळी ड्रामा करणं बंद करा”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी परीक्षकांना ट्रोल केलं आहे.