सोनी टिव्हीवरील ‘इंडिया गॉट टॅलेंट’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात विविध स्टंट पाहून प्रेक्षकांची बोबडी वळते. सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे ९ वे पर्व सुरु आहे. या कार्यक्रमातीत एका स्पर्धकाचा स्टंटदरम्यान अपघात झाला आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ सध्या सोनी टिव्हीने नुकतंच शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

या प्रोमोशनल व्हिडीओमध्ये एक स्पर्धक स्टंट करताना दिसत आहे. प्रीतम नाथ असे या स्पर्धकाचे नाव आहे. हा स्पर्धक आगीचा एक धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. यात स्टंटदरम्यान प्रीतमला एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले. त्याला बंद करुन ठेवलेली ती खोली गवताची आहे. त्यानंतर त्या गवताच्या खोलीला आग लावण्यात येते. ती आग वेगाने पसरत जाते.

ही आग सुरु असताना प्रीतमला स्वतःचे कुलूप उघडून खोलीतून बाहेर पडायचे असते. मात्र तिला बाहेर पडता येत नाही. यावेळी त्याचा दुसरा स्पर्धक त्याच्या मदतीला धावून येतो. दरम्यान या स्टंटवेळी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे परिक्षक बादशाह घाबरतात. त्यावेळी बादशाह आणि शिल्पा हे ज्या टीव्ही स्क्रीनवरून तो स्टंट सुरु असतो तो बंद होतो. बादशाह घाबरतो आणि म्हणतो, ‘मला टीव्हीवर काहीच दिसत नाही’.

त्यावेळी स्पर्धक प्रीतम हा मदतीसाठी आवाज देतो. त्यानतंर बादशाह त्याच्या जागेवरून उठतो आणि स्टंट थांबवण्यासाठी बजर वाजवतो. यावेळी अग्निशमन दलाला बोलवण्यात येते. तर दुसरीकडे शिल्पा शेट्टीही हा सर्व प्रकार पाहत असताना प्रचंड घाबरलेली पाहायला मिळते. यावेळी शिल्पा शेट्टी ओरडते. या प्रोमोमुळे खरोखरच प्रेक्षक थक्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचे फोटो चर्चेत, साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या स्टंटनंतर नेमके काय झाले, प्रीतमची प्रकृती कशी आहे? त्याला गंभीर दुखापत झाली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. बादशाह, शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा शो किरण खेर आणि मनोज मुनताशीर हे परिक्षक म्हणून पाहायला मिळत आहे.