दिग्दर्शक पॅन नलिन यांचा ‘छेल्लो शो’ हा चित्रपट भारताकडून ऑस्कर २०२३ मध्ये पाठवला जाणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. पॅन नलिन यांनी त्याच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट गुजरातमध्ये राहणाऱ्या नऊ वर्षीय समयला सिनेमाबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे. या चित्रपटासंदर्भातील एक दुःखद बातमी समोर आली आहे.

छेल्लो शोमध्ये सहा बालकलाकारांनी एकत्र काम केले आहे. याच चित्रपटामध्ये मनु हे पात्र साकारणाऱ्या ‘राहुल कोळी’चं निधन झालंय. कर्करोगामुळे १५ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, “मृत्यूपूर्वी राहुलला वारंवार ताप येत होता. मध्येच तो रक्ताच्या उलट्या करु लागला.” पुढे ते म्हणाले “आम्ही त्याची शेवटची आठवण म्हणून छेल्लो शो नक्की पाहणार आहोत.” राहुल त्याच्या भावंडामध्ये सर्वात धाकटा मुलगा होता.

आणखी वाचा – “तुम्ही देशातील श्रेष्ठ आणि अद्भुत…” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

“रविवारी २ ऑक्टोबर रोजी राहुलने सकाळी नाश्ता केला. त्यानंतर त्याला लगेच ताप यायला लागला. हळूहळू त्याचा ताप वाढत गेला. तापात असताना त्याला उलट्या व्हायला लागल्या. त्याने तीन वेळा रक्ताच्या उलट्या केल्या. तिसऱ्यांदा जेव्हा त्याला रक्ताची उलटी झाली, तेव्हा त्याच क्षणी आम्ही आमचा मुलगा गमावला. त्याच्या जाण्याने आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. शेवटचे अंत्यविधी केल्यानंतर आम्ही त्याच्या आठवणीत हा चित्रपट पाहणार आहोत.” असे राहुल कोळीच्या वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. दरम्यान त्याचा मृत्यू कर्करोगाने झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी वाचा – ऑस्करसाठी निवडला गेलेला ‘छेल्लो शो’ पाहता येणार फक्त ९५ रुपयात, दिग्दर्शकांनी प्रदर्शनाची तारीखही सांगितली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छेल्लो शो’ या चित्रपटामध्ये समय हे पात्र मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहे. समयला सिनेमा पाहायचे वेड असते. या वेडापायी तो सिनेमा हॉलमध्ये प्रोजेक्टर चालवणाऱ्या माणसाशी मैत्री करतो. पुढे प्रोजेक्टर असलेला सिनेमा हॉल बंद झाल्याने समय त्याच्या मित्रांबरोबर मिळून टाकाऊ वस्तूंपासून एक प्रोजेक्टर तयार करतो.