पद्मनाभ गायकवाड सोबत गप्पा,
फार कठीण झाले असते, जर हे उलट प्रवाहातून झाले असते. हा सुद्धा क्रम काही सोपा नाहीये. प्रचंड मोठ्या परिश्रम साखळीतून जावे लागले. मूळचा माझा पिंड गायनाचा असल्याने, शिवाय घरचे वातावरण सुद्धा गायनातून असल्याने, अभिनयाकडे वळण्याचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. हा सर्वस्वी दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आहे. कथेची गरज आहे.

प्रश्न: सिनेमामध्ये अभिनय करायचे ठरवले होते का?
उत्तर: नाही, मी गायनात आणि रियाजात, अभ्यासात रमलो होतो. शिवाय मी आणि माझा चेहरा चित्रपटाच्या पडद्यावर झळकण्यासाठी बनला होता ह्याचा मला तीळमात्र अंदाज नव्हता. निर्माता चेतन नामदेव नकटे आणि आय.डब्लू.एस. कंपनीमधून सिनेमासाठी कॉल आला. तेव्हा तो दिवस माझ्यासाठी फार काही कुतूहल घेऊन येणारा नव्हता. कारण, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम सिनेमामध्ये काम केल्यामुळे सिनेमाचे पर्याय खूप येत होते. झी सारेगमप लिटिल चॅम्पनंतर माझ्या गायनाच्या प्रवासाला एक दिशा मिळाली होती. त्यावेळी मी दहा वर्षांचा होतो. करिअर ह्या शब्दाचा अर्थ समजण्याइतके सुद्धा वय नव्हते. परंतु पुढचा प्रवास सुरु झाला. खरी गम्मत सुरु झाली, जेव्हा मी दिग्दर्शक प्रीतम अभंग ह्याला मुंबईला भेटलो.

प्रश्न: आवडता नट कोणता?
उत्तर: आमिर खान. त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याचे स्वत:चे खूप मोठे योगदान असते. दिग्दर्शकाइतकाच तोही कथेवर तितकाच अभ्यास करतो. त्यामुळेच लोकांना त्याचे पडद्यावरचे काम आवडते.

प्रश्न: ह्या सिनेमाच्याबाबतीत कथा तुला पटली का?
उत्तर: स्टोरी ज्यावेळी ऐकण्यासाठी माझी आणि प्रीतम अभंगची भेट झाली, त्या अगोदर मला इतका हुरूप वाटला नव्हता. खरे सांगायचे तर मला काही स्टोरीज धडकल्या होत्या. परंतू, अभिनय करावा असा विचार करायला प्रवृत्त करत नव्हते. परंतू, गणू संकल्पना माझ्यातली वाटली. माझ्यासारखी वाटली. ताबडतोब होकार दिला. होकार दिला बोलण्यापेक्षा ही संधी सोडायची नव्हती असे वाटायला लागले. पण खरी गम्मत म्हणजे मी अभिनयसाठी स्वतः तयार नव्हतो . प्रीतम अभंगने माझ्यावर खूप मेहनत घेतली.

प्रश्न: तुकाराम फिल्मनंतर गणू, तुझ्यासाठी काही गोष्टी बदलल्या का?
उत्तर: हो नक्कीच, तुकाराम फिल्मनंतर गणू माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी खूप कालावधी गेला . मुळात समजायला असे असेल गायनातून भाव खुलायला लागतात. चेहऱ्यावर यायला लागतात. स्वरात यायला लागतात. तसेच, अभिनयात सुद्धा भाव चेहऱ्यावर सीमित राहत नाहीत.

प्रश्न: गणू सिनेमा कधी येतोय लोकांना भेटायला?
उत्तर: लवकरच, मी ही तितकाच उत्सुक आहे. पण मी इतकेच सांगेन, की लवकरच. धन्यवाद.