बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी होते. आज या अभिनेत्याची जयंती आहे. इरफानचा जन्म ७ जानेवारी १९६७ मध्ये राजस्थान मधील टोंक या गावात झाला होता. इरफान यांच्या अभिनयाने जनू प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली आहे. तुम्हाला माहितीये सगळ्यांच्या मनावर छाप सोडलेल्या इरफान यांच्या मनात तर अभिनेता राजेश खन्ना यांनी छाप सोडली होती. त्यांना भेटण्यासाठी इरफान यांनी एक युक्ती लढवली होती आणि राजेश खन्ना यांच्या घरी पोहोचले होते.

इरफान अभिनय करण्यापूर्वी मुंबईत इलेक्ट्रिशियनचं काम करायचे. इलेक्ट्रिशियन असल्याने इरफान यांना एकदा चांगली संधी मिळाली होती. एक दिवस राजेश खन्ना यांच्या घरी एसी ठिक करण्यासाठी इरफान पोहोचले होते. पण राजेश खन्ना यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झालीच नाही. कारण योगायोगाने त्या दिवशी राजेश खन्ना घरी नव्हते.

आणखी वाचा : पाकिस्तानी मंत्र्याने केला ‘टिप-टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स?

१९८७ मध्ये एनएसडीमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर इरफान यांनी मीरा नायरच्या समान बॉम्बे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांची खूप लहान भूमिका होती. त्यानंतर इरफान यांनी छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली.

आणखी वाचा : झुलन गोस्वामींच्या बायोपिकमधून अनुष्का करणार कमबॅक, पण टीझर पाहताच नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इरफान यांचे २९ एप्रिल २०२० रोजी निधन झाले. त्यांना न्यूरोएन्डोक्राईन टय़ुमर हा दुर्धर आजार होता आणि त्यांनी विदेशातही यावर उपचार केले होते. वयाच्या ५४ व्या वर्षी इरफान यांनी जगाचा निरोप घेतला.