Janhvi Kapoor Latest Post : जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि अनेकदा ती बॉयफ्रेंड शिखर पहारियाबरोबर दिसते.
दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा वेळोवेळी होत होत्या. मात्र, जान्हवीने नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
जान्हवी कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, जी तिने नंतर डिलीट केली, मात्र तोपर्यंत ती व्हायरल झाली होती. आता या पोस्टनंतर जान्हवीबद्दल सर्व प्रकारच्या अटकळ बांधल्या जात आहेत. अनेक चाहते याला जान्हवीच्या लग्नाशीही जोडत आहेत. जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘२९ ऑक्टोबरची तारीख सेव्ह करा.’ याबरोबर तिने हार्ट इमोजीसह डान्सिंग गर्ल आणि फ्लाइटचा फोटो शेअर केला आहे. मात्र, काही वेळाने जान्हवीनेही ही स्टोरी डिलीट केली, मात्र तोपर्यंत ती व्हायरल झाली होती.
आता जान्हवीने या तारखेचा उल्लेख करताच चाहत्यांनी सर्वप्रथम अभिनेत्रीच्या लग्नाची अटकळ बांधायला सुरुवात केली; तर काहींनी असा तर्क लावलाय की, जान्हवीच्या ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाची घोषणा २९ ऑक्टोबरला होऊ शकते. आता या पोस्टमागचा खरा अर्थ काय, याची थोडी वाट पाहावी लागेल.
सध्या जान्हवी कपूर किंवा शिखर पहारिया यांच्यापैकी कोणीही २९ ऑक्टोबरला नक्की काय घडणार आहे, याची अधिकृत माहिती दिलेली नाही. जान्हवी कपूर अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ‘परम सुंदरी’ या चित्रपटात आणि या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

जान्हवी कपूरने २०१८ साली ‘धडक’ सिनेमातून पदार्पण केलं. यानंतर ती ‘गुंजन सक्सेना’, ‘रुही’, ‘उलझ’, ‘मिली’, ‘देवारा’, ‘परम सुंदरी’ आणि आता नुकतंच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मध्ये दिसली.
