अभिनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. लवकरच ती ‘जी ले जरा’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे. प्रियांकासोबत या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानं स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रानं एका मुलाखतीत स्वतःबद्दल नवा खुलासा केला आहे. या मुलाखतीत प्रियांकानं, हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर हिंदीचा विसर पडल्याची कबुली दिली आहे. ती म्हणाली, ‘मी चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तरला सांगितलं आहे की, चित्रपटात माझ्याकडून डान्स करून घेणं अधिक फायदेशीर ठरेल. मी हिंदी बोलून बराच काळ उलटला आहे. त्यामुळे हिंदी बोलताना मला अडचण येऊ शकते.’

‘जी ले जरा’ चित्रपटाच्या निमित्तानं फरहान अख्तर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फरहानने त्याची बहीण जोया अख्तर आणि रीमा कागती यांच्यासोबत या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील तयार केली आहे. रोड ट्रीपला जाणाऱ्या मुलींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

आपल्या आगामी चित्रपटांसाठी बोलताना प्रियांका म्हणाली, ‘हिंदी संवाद बोलून मला बरेच दिवस उलटून गेले आहेत. बॉलिवूड गाण्यावर डान्स करूनही बराच काळ लोटला आहे. त्यामुळे मी फरहानला म्हटलं की या चित्रपटात एखाद्या गाण्यावर डान्स करणं माझ्यासाठी योग्य ठरेल.’ या चित्रपटात ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील अभिनेते पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती सध्या ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा ‘मॅट्रिक्स’ फ्रान्चाइजीचा चौथा चित्रपट आहे. आज प्रियांकाचं हॉलिवूड करिअर सध्या यशस्वी ठरत आहे. मात्र त्यासाठी मागच्या १० वर्षांत प्रियांकानं यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.