दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा द राइज’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत होते. अल्लू अर्जुनने पुष्पा ही भूमिका साकारली तर रश्मिकाने श्रीवल्ली ही भूमिका साकारली. दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. त्यांचे डायलॉग आणि अभिनयाने जणू काही प्रेक्षकांच्या मनावर जादूच केली होती. आता रश्मिका लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर स्वत: रश्मिकाने वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नुकताच रश्मिकाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी तिला लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत ती म्हणाली, ‘लग्न करण्यासाठी मी खूप लहान आहे. मी याविषयी काय विचार करु हे मला कळत नाहीये. पण हा प्रश्न विचारला आहे तर यावर मी इतकच बोलेन की मला माझ्या आयुष्यात असा माणूस हवा जो मला कंफर्टेबल फिल करुन देईल.’
आणखी वाचा : काजोलने मुंबईत खरेदी केले दोन नवे फ्लॅट, किंमत ऐकून बसेल धक्का
पुढे ती म्हणाली, ‘एकमेकांचा आदर करणे याला प्रेम म्हणतात. तुम्ही एकमेकांसोबत सुरक्षित असल्याची भावना मनात यायला हवी. प्रेमाविषयी आणखी काही बोलणे कठीण आहे कारण ती एक भावना आहे. आपण त्या भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही.’
कामाविषयी बोलायचे झाले तर रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. तसेच ती बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतही एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे.