जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या मुकेश अंबानी व नीता अंबानींची मुलगी ईशा काही महिन्यांपूर्वीच आई झाली. १९ नोव्हेंबरला ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशाने मुलाचे नाव कृष्णा तर मुलीचे नाव आदिया असं ठेवलं आहे. आता ईशा अंबानीच्या मुलीला एक खूप महागडं गिफ्ट मिळालं आहे.
ईशा अंबानीची लेक आदिया सध्या तिला मिळालेल्या या खास गिफ्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिला मिळालेल्या या खास गिफ्टमध्ये १०८ सोन्याच्या घंटा आहेत. ही फक्त भेटवस्तू नाही तर या भेटवस्तू मागे खूप मोठा अर्थ दडला आहे. या गिफ्टचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या गिफ्टला लाल रंग देऊन त्याला सोन्याच्या घंटा, दिवे आणि झेंडूच्या फुलांनी सजवलं आहे. याच्या वरच्या बाजूला ‘आदिया शक्ति’ असं लिहिण्यात आलं आहे. तर याच्या सर्वात खालच्या बाजूला एक मोठा खण असून त्यात गुलाबी कागदात गुंडाळलेल्या अनेक भेटवस्तू ठेवल्या आहेत. प्रत्येक पायरीवर देवी शक्तीची नावं आणि त्यांचे अर्थ लिहिलेले आहेत. यात १०८ घंटा आहेत, ज्या हिंदू वेदांच्या १०८ मंत्रांचं प्रतीक आहेत. या गिफ्टमधून देवी-देवतांच्या शक्तींचं एकत्र वर्णन करण्यात आलं आहे.
आदियाला मिळालेल्या या गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हे गिफ्ट पाहून आणि या मागचा अर्थ कळल्यावर नेटकरी अवाक् झाले आहेत. आता सोशल मीडियावर या गिफ्टबद्दल विविध प्रतिक्रिया देत नेटकरी ही भेटवस्तू खूप आकर्षक असल्याचं सांगत आहेत.