अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिने बुधवारी सकाळी बाळाला जन्म दिला. सलमानचा मेहुणा म्हणजेच अर्पिताचा पती आयुष शर्माने ही गोड बातमी शेअर केली आहे. मुंबईतील हिंदुजा हेल्थकेअर रुग्णालयात अर्पिताने बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. दरम्यान, बाळाचे नाव ‘अहिल’ ठेवण्यात आल्याचेही आयुषने सांगितले. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अरबाज यांच्यातील दुराव्यामुळे खान कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अर्पिताचे ‘बेबी शॉवर’ 

Our Prince has arrived 😃😃😃😃

A photo posted by Aayush Sharma (@aaysharma) on

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.