बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या डान्ससोबतच तिच्या सौंदर्यामुळे अनेकांची फेव्हरेट आहे. नुकतच जॅकलिनला काही फोटोग्राफर्सनी स्पॉट केलं होतं. यावेळी जॅकलीनच्या गाडीभोवती काही गरीब मुलांनी गराडा घातला होता. या गरीब मुलांनी जॅकलिनचं कौतुक केलं तर जॅकलिनने देखील या मुलांना चॉकलेट देत त्यांचं मन जिंकलं जॅकलिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काही गरीब मुलांनी जॅकलिनच्या गाडीभोवती गराडा घातल्याचं दिसतंय. यातील एक मुलगी जॅकलिनला “दीदी तुम्ही खूप मस्त सिनेमा काढला.” असं म्हणताना दिसतेय. त्यानंतर जॅकलिन गाडीचं दार उघडून या मुलीला चॉकलेट देते. चॉकलेट मिळताच मुलीला प्रचंड आनंद झाल्याचं दिसतंय. त्यानंतर ती जॅकलिनला “दीदी तुमचं नावदेखील खूप सुंदर आहे” असं म्हणतेय. जॅकलिनचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांची तिचं कौतुक केलंय.

कॉस्मेटिक सर्जरी बिघडल्याने मॉडेलने दाखल केला ५० मिलियन डॉलरचा खटला

जॅकलिन फर्नांडिसचा ‘भूत पोलीस’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात जॅकलिनसोबतच अभिनेता सैफ अली खान, अर्जुन कपूर तसचं यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. तर जॅकलिन लवकरच ‘किक 2’ सिनेमात सलमान खानसोबतच झळकणार आहे. ‘सर्कस’ आणि बच्चन पांडे या आगामी सिनेमात ती खास भूमिकांमध्ये झळकेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez gave chocolate to poor children video goes viral kpw
First published on: 25-09-2021 at 11:24 IST