अंमलबजावणी संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही चर्चेत आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून अनेकदा जॅकलिनची चौकशी करण्यात येते. दरम्यान, यासगळ्यामध्ये आता या सगळ्यानंतर जॅकलिनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जॅकलिनचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्रामवरील पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत जॅकलिन पोल डान्स करताना दिसते. तर बॅकग्राऊंडला अमेरिकन गायिका सियाचं अनस्टॉपेबल हे गाणं प्ले होतं आहे. जॅकलिनने यात सुंदर डान्स करत आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांना जॅकलिनचा डान्स आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य

आणखी वाचा : अभिनेत्रीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या अभिनेत्याने रचला पोलिसांच्या हत्येचा कट?

आणखी वाचा : Bigg Boss 15 : ‘तुला चप्पलने मारेन’, नेहा भसीनची धमकी ऐकताच बिचुकलेचा चढला पारा म्हणाला…

सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला गुच्ची जिम वेअर, गुच्ची शूज, रोलॅक्स घड्याळ, १५ जोड कानातले, ५ बिर्किन बॅग, हर्म्स बांगड्या आणि एली बॅग यांसारखे महागडे गिफ्ट्स दिले होते. याशिवाय सुकेशने जॅकलिनला मिनी कूपर कारही भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे सुकेशने जॅकलिनच्या आईला १ लाख ८० हजार डॉलरची पोर्श कारही भेट म्हणून दिली होती.

काही दिवसांपूर्वी जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरला ती कशी भेटली याबाबतचा खुलासा केला होता. ती सुकेश चंद्रशेखरला कशी भेटली याबाबतही तिने उघडपणे सांगितले आहे. जॅकलिनने सुकेशला फेब्रुवारी २०१७ पासून ओळखत असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये अटक झाल्यानंतर ती कधीही त्याला भेटली नाही, असेही तिने म्हटले होते.