जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अवतारच्या पहिल्या भागाने बॉक्सऑफिसवर दणक्यात कमाई केली होती. अवतारह्या कमाईचा रेकॉर्ड तब्बल १० वर्षांनी मार्वेलच्या ‘एंडगेम’ या चित्रपटाने मोडला. एकूणच चित्रपटप्रेमी याच्या नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच चित्रपटाबाबत एक मजेशीर खुलासा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने म्हणजेच जेम्स कॅमेरून यांनी केला आहे.

अवतारचा पहिला भाग हा २ तास ४२ मिनिटांचा होता, पण याच्या दुसऱ्या भागाची लांबी ही ३ तास १२ मिनिटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीही हा चित्रपट जेम्स यांच्या ‘टायटॅनिक’पेक्षा ३ मिनिटांनीच कमी आहे. मध्यांतर ही गोष्ट भारतीयांसाठी जरी माहितीची गोष्ट असली तरी पश्चिमेकडील देशांमध्ये चित्रपटाला मध्यांतर नसतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे बाहेरच्या देशातील चित्रपटांची लांबी ही दोन ते अडीच तास एवढीच असते.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

आणखी वाचा : ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’, ‘पॅडमॅन’नंतर अक्षय कुमार घालणार या गंभीर मुद्द्याला हात; नव्या चित्रपटाची केली घोषणा

नुकतंच ‘द हॉलिवूड रीपोर्टर’ या मासिकाला मुलाखत देताना जेम्स कॅमेरून यांनी प्रेक्षकांनी चित्रपट सुरू असताना टॉयलेटला कधी जावं याबद्दल खुलासा केला आहे. चित्रपटाची लांबी जास्त असल्याने तिथल्या बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे. यावर उत्तर देताना जेम्स म्हणाले, “प्रेक्षक चित्रपट सुरू असताना कधीही उठून टॉयलेटला जाऊ शकतात, त्यासाठी अशी ठराविक वेळच हवी असं नाही, फक्त नंतर जे सीन्स त्यांच्याकडून बघायचे राहून गेले असतील त्यासाठी त्यांना पुन्हा चित्रपट पहावाच लागेल.”

याबरोबरच एंपायर मासिकाला मुलाखत देताना जेम्स यांनी स्पष्ट केलं की, “चित्रपटाच्या लांबीला त्याचा सर्वात मोठा तोटा कुणीही समजू नये. मी माझ्या मुलांबरोबर एक एक तासाचे ५ टीव्ही शोजचे एपिसोड सलग पाहिले आहेत. हा एकप्रकारचा आमूलाग्र बदल आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना उठून टॉयलेटला जाणं हे अगदीच साहजिक आहे.” १६ डिसेंबर या दिवशी ‘अवतार २’ चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.