अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘रुही’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग काल मुंबईत पार पडलं. या सोहळ्यासाठी जान्हवीचे खास पाहुणे उपस्थित होते आणि विशेष म्हणजे तिचे त्यांच्यासोबतचे फोटोज पाहून तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत. सोशल मीडियावरही तिचे हे फोटोज चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत.
तिचे हे खास पाहुणे आहेत तिच्या असिस्टंटच्या परिवारातील सदस्य. होय, जान्हवी कपूरने आपल्या असिस्टंटच्या परिवाराला ‘रुही’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी बोलवलं होतं. या स्क्रिनिंगचे जे व्हिडिओज समोर येत आहेत, यात ती ह्या बाळासोबत खेळताना दिसत आहे. फोटोग्राफर्सनी तिला या परिवारासोबत फोटो काढायला सांगितलं, तेव्हा ती आनंदाने तयारही झाली.
View this post on Instagram
या फोटोमध्ये त्या असिस्टंटसोबत त्याची तीन मुले आणि त्याची पत्नी दिसत आहे. त्याच्या लहान मुलाला जान्हवीने कडेवर घेतलं आहे तर इतर दोन मुलं मात्र फोटो घेण्यात व्यस्त दिसत आहेत.
View this post on Instagram
जान्हवीच्या ह्या वागण्याने तिचे चाहते भलतेच खूश झाले आहेत. एकाने लिहिलं आहे की, “जान्हवी ही सगळ्या नम्र स्टारकीड आहे. ज्या पद्धतीने तिचं बोलणं वागणं आहे, त्यातून तिच्यावर श्रीदेवीने किती चांगले संस्कार केले आहेत हे दिसून येत आहे”. तर या फोटोज, व्हिडिओजनी तिने नवे चाहतेही बनले आहेत. एकजण लिहितो की, “ती किती निर्मळ आहे. मी तिच्याबद्दल गैरसमज करून घेतला. पण जान्हवी, आता मी तुझा चाहता झालो आहे.”
जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या हॉरर चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे.