बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत जान्हवी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जान्हवीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल आहे.
जान्हवीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवी आणि तिची बहिण खुशी योगा मॅट वरून भांडताना दिसतं आहेत. त्या दोघांनाही योगा मॅट पाहिजे. खुशी योगा मॅटवर लोळली आहे तर जान्हवी तिला उठवत योगा मॅट काढूण घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा त्यांचा पायलेट्स सेशन असल्याचे दिसतं आहे. “आम्ही वर्कआऊटला गंभीरतेने घेतो”, अशा आशयाचे कॅप्शन जान्हवीने हा व्हिडीओ शेअर करत दिले आहे. हाच व्हिडीओ जान्हवीच्या फॅनक्लबने देखील शेअर केला आहे.
आणखी वाचा : सीतेच्या भूमिकेसाठी मानधनाची रक्कम वाढवलेल्या करीनाची पाठराखण करत तापसी म्हणाली…
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘जेठालाल कडून चूर्ण घ्या’, नेटकऱ्याने दिग्दर्शकाला दिला सल्ला
दरम्यान, जान्हवी लवकरच ‘दोस्ताना 2’, ‘गुड लक जेरी’, ‘तख्त’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा देखील होते. या चित्रपटातील जान्हवीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तर नेटकऱ्यांनी जान्हवीच्या अभिनयाचे कौतुक केले.