चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी कधी काय करतील याचा नेम नसतो. कधी ते त्यांच्या इवेंटला जाऊन बसतात तर कधी कलाकारांच्या घराबाहेर जाऊन वाट पाहत असतात. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोबत झाले होते. जान्हवीचा एअरपोर्ट वरील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता जान्हवीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओमध्ये जान्हवी मुंबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. जान्हवी तिच्या गाडीकडे जात असताना अनेक चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे आले. जान्हवीने स्मितहास्य करत त्या चाहत्या सोबत फोटो काढला. त्याचवेळी एक चाहता जान्हवीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या कर्मचाऱ्याने या चाहत्याच्या हातावर फटका मारत दुर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा ही गोष्ट जान्हवीच्या लक्षात आली तेव्हा तिने त्या चाहत्याला नाराज न करता, त्या चाहत्या जवळ गेली आणि सेल्फी काढून दिला.

स्पॉटबॉने दिलेल्या वृत्तानुसार, “मला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. मी माझ्या कर्मचाऱ्याशी या बद्दल बोलली आहे. मला आशा आहे की ती व्यक्ती नंतर आनंदाने घरी गेली असेल” असे जान्हवी म्हणाली.

‘रुही’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा असून दिनेश विजय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या आधी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी सिनेमाची त्यांनी निर्मिती केली होती.