इंडियन आयडल 12 मध्ये आजचा एपिसोड गीतकार जावेद अख्तर यांना डेडिकेट करण्यात आलं होतं. आजच्या एपिसोडमध्ये शोमधील सर्व स्पर्धकांनी गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या गाण्यांची मैफिल रंगवली होती. या शोमध्ये गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या गाण्यांचे अनेक किस्से सांगितले आहेत जे कधी समोर आलेच नाहीत. तुम्हाला अनिल कपूरचं ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे रोमॅण्टिक गाणं आठवतंय का ? या रोमॅण्टिक गाण्यांची क्रेझ आजही पाहायला मिळते. या एका गाण्याने अनिल कपूरचं आयुष्यंच बदलून गेलं. नाव, पैसा, प्रतिष्ठा सर्व काही त्यांना या गाण्यामुळे मिळालं. नेमका काय आहे या गाण्याचा किस्सा?… गीतकार जावेद अख्तर यांनीच सांगितलेली ही कहाणी वाचाच…

सोनी टीव्ही वरील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल 12’ यंदाच्या एपिसोडमध्ये गीतकार जावेद अख्तर हे प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. यावेळी शोमधील कंटेस्टंट निहालने ‘1942: लव स्टोरी’ मधील गाणं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं गायलं. निहालचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहून गीतकार जावेद अख्तर यांनी त्याचं खूप कौतुक केलं. हे गाणं ऐकून जावेद अख्तर यांनी या गाण्याचा एक किस्सा शेअर केला. ‘1942: लव स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विधु विनोद चोपडा करत होते आणि संजय लीला भन्साळी त्यांना असिस्ट करत होते. या चित्रपटासाठी एक मीटिंगही झाली होती. या मीटिंगमध्ये फराह खानसह आणखी बरेच लोक उपस्थित होते. ज्यावेळी गीतकार जावेद अख्तर यांनी चित्रपटाची कहाणी ऐकली, तेव्हा त्यात एक गाणं असलं पाहिजे असा सल्ला दिला. त्यावेळी चित्रपटाच्या कथेत मुलाने फक्त एकदाच बसमध्ये मुलीला पाहिलेलं असतं, तर त्या सीनला गाणं कसं देणार? असा प्रश्न जावेद अख्तर यांना विचारला. पण त्यावेळी जावेद अख्तर यांनी अक्षरशः वाद घालत त्या सीनऐवजी गाणेच टाकण्यासाठी हट्ट धरला आणि सगळ्यांना यासाठी तयार केलं. आधी गाणं तयार करा आणि ते गाणं सीनसाठी साजेसं असेल तरच करूया, असं चित्रपटाच्या टीमने जावेद अख्तर यांना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाणं लिहिणंच विसरले होते

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मीटिंग बसणार होती आणि त्या मीटिंगमध्ये गीतकार जावेद अख्तर यांना ते गाणं लिहून सादर करायचं होतं. ज्यावेळी पुढच्या मीटिंगसाठी त्यांना फोन आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण गाणं लिहायचंच विसरलो. पण मीटिंगमध्ये काहीही करून गाणं लिहून द्यायचंच होतं. त्या काळी जावेद अख्तर स्वतः ड्राईव्ह करत होते. मीटिंगसाठी बांद्रावरून सांताक्रूझला जायचं होतं. त्यामूळे मीटिंगचं ठिकाणी देखील जवळ असल्याने प्रवासात ही जास्त वेळ मिळणार नव्हता. रस्त्यात जेव्हा त्यांनी एका थिएटरबाहेर आपली कार थांबवली, तेव्हा तिथे उभा असलेल्या एका ट्रकवरची ओळ पाहून त्यांना गाणं लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मीटिंगमध्ये जाऊन कोणतं गाणं सांगणार हे काहीच ठरवलेलं नव्हतं. पण नंतर मीटिंगमध्ये गेल्यानंतर जावेद अख्तर यांनी काही वेळाआधी ट्रकवर पाहिलेल्या ओळीवरून गाणं सांगितलं, “एक लडकी को देखा तो ऐसा लगा…”. अशा प्रकारे हे रोमॅण्टिक गाणं तयार झालं.