शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे.

शाहरुखबरोबरच या चित्रपटात ५ अभिनेत्रीदेखील आहेत त्यांच्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्या पाचपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी प्रियामणी. प्रियामणीने याआधी शाहरुखच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’साठी एका गाण्यावर काम केलं होतं. प्रियामणी ही दक्षिणेतील अत्यंत लोकप्रिय अन् गुणी अभिनेत्री आहे. ‘जवान’मुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीचा १२ वर्षांपूर्वीचा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज चर्चेत; फोटो पाहून नेटकऱ्यांचा विश्वास बसेना

नुकतंच प्रियामणीने उघडपणे ऑन स्क्रीन किसिंगबद्दल भाष्य केलं आहे. प्रियामणीनी सुरुवातीपासून ऑन स्क्रीन किसिंगसाठी विरोध दर्शवला होता. याला कारणीभूत तिची सासरकडची मंडळी आणि पती होते. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियामणी म्हणाली, “मी ऑन स्क्रीन किस करू शकत नाही, जर मी असं केलं तर मला माझा नवरा जाब विचारेल. मला माहितीये की हा आमच्या व्यवसायाचा एक भाग आहे, पण मला ऑन स्क्रीन किसिंग सीन देताना फारच अवघडल्यासारखं होतं.”

View this post on Instagram

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच लग्नानंतर एका नव्या कुटुंबाची जवाबदारी आपल्यावर असल्याने अशा गोष्टी पडद्यावर करणं योग्य नसल्याचं प्रियामणीने सांगितलं. बऱ्याचदा प्रियामणीला यामुळे कित्येक चित्रपट सोडावे लागले आहेत. परंतु करिअरमध्ये प्रियामणीच्या घरच्यांनी तिला प्रचंड प्रोत्साहन दिल्याचंही अभिनेत्रीने कबूल केलं. २०१७ मध्ये प्रियामणीने मुस्तफा राज यांच्याशी लग्नगाठ बांधली.