Amitabh Bachchan Rekha Affair : अमिताभ बच्चन व रेखा यांचं एकेकाळी अफेअर होतं, त्यांच्या प्रेम कहाणीची चर्चा आजही होत असते. या दोघांची जवळीक ‘दो अनजाने’च्या सेटवर वाढली होती, असं म्हटलं जातं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचं जया भादुरी यांच्याशी लग्न झालं होतं.
रेखा यांनी अनेक वेळा बिग बींबद्दलचे प्रेम व्यक्त केले, परंतु अभिनेत्याने कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. अभिनेत्रीवर लिहिलेल्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकातही लेखक यासिरने त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख केला आहे. आता पुन्हा एकदा ही प्रेमकहाणी चर्चेत आहे. खरंतर, ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी अलीकडेच हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलल्या आणि त्यांच्याशी संबंधित एक किस्साही सांगितला. पूजा यांनी या संपूर्ण प्रकरणात जया बच्चन यांची भूमिका काय होती हे देखील सांगितले. चला जाणून घेऊया त्यांनी याबद्दल काय म्हटले आहे.
या प्रकरणात सहभागी असलेल्या तीन लोकांपैकी रेखा एकमेव आहे, ज्यांनी या विषयावर उघडपणे बोलल्या आहे. पूजा म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत त्यांनी अमिताभ यांच्याबद्दल घेतलेल्या सर्व मुलाखतींमध्ये त्यांनी रेखा यांचा एकदाही उल्लेख केलेला नाही. ज्येष्ठ पत्रकार म्हणाल्या, “मी अमिताभ यांची अनेक वेळा मुलाखत घेतली आहे, पण त्यांनी रेखाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे कधीच दिली नाहीत. ते या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे आणि दुसरीकडे, जया कधीही मुलाखत देत नाहीत, परंतु नंतर असे ऐकायला मिळाले की जया रागावल्या आहेत.”
पुढे त्यांनी एक किस्सा सांगितला आणि म्हणाल्या, “एकदा जया यांनी रेखा यांना त्यांच्या घरी जेवणासाठी बोलावले आणि जेवणानंतर त्यांनी रेखा यांना जाणीव करून दिली की ती मिसेस बच्चन आहे आणि नेहमीच मिसेस बच्चन राहील.” पूजा पुढे म्हणाल्या की हा एक प्रकारचा इशारा होता की तुम्ही आमच्या आयुष्यातून निघून गेलात तर बरे होईल.”
अमिताभ बच्चन आणि रेखा शेवटचे ‘सिलसिला’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात जया बच्चन देखील होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला, पण अनेक वर्षांनंतर तो कल्ट क्लासिक बनला.