Jennifer Lopez Gets Intimate With Her Dancers: अमेरिकन गायिका जेनिफर लोपेज सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. आता एका कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायिकेच्या एका कृतीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

गायिकेने परफॉर्मन्सदरम्यान बॅकग्राउंड डान्सरबरोबर केले लिपलॉक

५५ वर्षीय जेनिफर लोपेज अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती. हा कार्यक्रम सोमवारी म्हणजेच २६ मे रोजी लास वेगासमध्ये पार पडला. तिने तिच्या परफॉर्मन्सद्वारे सर्वांची मने जिंकली. मात्र, तिच्या एका कृतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. जेनिफरने अमेरिकन म्युझिक अवॉर्डमध्ये सहा मिनिटांचा परफॉर्मन्स केला. जेनिफरने या वर्षी गाजलेल्या काही गाण्यांवर डान्स केल्याचे पाहायला मिळाले.

त्याबरोबरच तिने बॅकग्राऊंड डान्सरबरोबर लिपलॉक केले आहे. विशेष बाब म्हणजे या बॅकग्राउंड डान्सरमध्ये महिला व पुरुष दोघेही होते. गायिकेने त्यांच्याबरोबर लिपलॉक केल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. जेनिफरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

अनेक चाहत्यांनी गायिकेच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे; तर काहींनी धक्का बसल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. चाहते नेमकं काय म्हणालेत, ते जाणून घेऊ. एका नेटकऱ्याने लिहिले, “लक्ष वेधण्यासाठी काहीही करतात. तुम्ही वृद्ध होत आहात, ते स्वीकारा आणि स्वत:वर प्रेम करण्याचा पर्याय निवडा.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “बिचारी, आताच्या काळाबरोबर चालण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणतेही टॅलेंट नसताना तिने या कार्यक्रमात स्वत:ची जागा निर्माण करण्यात यश मिळवले.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हे काय पाहायला मिळत आहे?”

“उदित नारायण गुरुदीक्षेसाठी वाट पाहत आहेत”, “आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना काय वारसा देत आहोत?”, “कोविड परत आला आहे, हे असे स्टंट करू नका”, “आताच्या काळाशी संबंधित राहण्यासाठी काहीही करत आहे”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी गायिकेच्या कृतीवर त्यांचे मत मांडले आहे. तसेच, जेनिफरची ही कृती चाहत्यांना आवडली नसल्याचे कमेंट्समधून पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेनिफरच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे, तर तिने चार वेळा लग्नगाठ बांधली आहे. १९९७ ला जेनिफरने ओजानी नोआबरोबर लग्न केले. १९९८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. २००१ मध्ये गायिकेने क्रिस जूडबरोबर लग्नगाठ बांधली आणि २००३ मध्ये ते वेगळे झाले. त्याआधी तिने मार्क अँथोनीबरोबर २००४ मध्ये लग्नगाठ बांधली होती; मात्र त्यांचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. २०२२ मध्ये तिने बेन एफ्लेकबरोबर लग्न केले होते. त्यांनी नुकताच २०२५ मध्ये घटस्फोट घेतला आहे.