सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींच्या यादीमध्ये जेनिफर विंगेटचा (Jennifer Winget) नंबर टॉपला आहे. जेनिफरला हिंदी मालिकांमुळे एक वेगळी ओळख मिळाली. ती छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहोचली. आपल्या कामाबरोबरच जेनिफर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. अभिनेत्री बिपाशा बासूचा पती आणि अभिनेता करण सिंह ग्रोवरबरोबर (Karan Singh Grover) जेनिफरचा घटस्फोट झाला. करण-जेनिफरच्या घटस्फोटाची बातमी ऐकताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण घटस्फोटानंतर जेनिफरची परिस्थिती काही वेगळी होती.

आणखी वाचा – Photos : परी म्हणू की सुंदरा…; प्राजक्ता माळीच्या नव्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

२०१४मध्ये जेनिफर आणि करण एकमेकांपासून कायदेशीररित्या विभक्त झाले. पण त्यानंतर जेनिफर घरातून बाहेर देखील येत नव्हती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला आहे. जेनिफरने सांगितलं की, “मी कुटुंबाच्या विरोधात जाऊन करणबरोबर लग्न केलं होतं. मी खूप खुश होते. इतकंच नव्हे तर गृहिणी म्हणून मी घर देखील सांभाळत होते. पण घटस्फोटानंतर माझं आयुष्यच बदललं. मी कोलमडून गेले होते. जवळपास दोन वर्ष माझी अवस्था अशीच होती.”

पुढे बोलताना ती म्हणाली की, “अशाप्रकारचं आयुष्य जगणं योग्य नाही असा मी नंतर विचार केला. मला जो व्यक्ती आवडत नाही तसेच समोरच्या व्यक्तीला देखील मी आवडत नाही अशा व्यक्तीबरोबर का राहायचं? असा प्रश्न मी स्वतःला विचारला. त्यानंतर आयुष्यामध्ये पुन्हा मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन वर्ष मी घरातून बाहेरच पडले नाही. सोशल मीडियाद्वारे माझ्यावर खूप टीका करण्यात आली. तो काळ माझ्या आयुष्यामधील सर्वात कठीण काळ होता.”

आणखी वाचा – VIDEO : सारा अली खान दाक्षिणात्य सुपरस्टारच्या प्रेमात, पाहा ‘कॉफी विथ करण’मध्ये बिनधास्त बोलली अभिनेत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण आता जेनिफर आणि करण त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहेत. करण बिपाशा बासूबरोबर सुखाचा संसार करत आहे. तसेच जेनिफर देखील तिचं आयुष्य एण्जॉय करताना दिसते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या कोड एम (Code M) या वेबसीरिजमधील जेनिफरने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं.