अभिनेता जितेंद्र जोशीने आजवर अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. मालिका, नाटक, चित्रपट किंवा वेब सीरिज प्रत्येक माध्यमामध्ये तो अभिनयातून व्यक्त झाला आहे. मात्र नुकतीच जितेंद्रने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 30 एप्रिलला जितेंद्रच्या आजींचं निधन झालंय. रमाबाई शर्मा असं त्यांचं नाव होतं. करोनाची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचं निधन झालं.
आजीच्या निधनानंतर जितेंद्र जोशीने त्यांचे काही फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहली आहे. सोबतच आजीच्या आठवणीत त्याने एक कविताही लिहिलीय. आजीच्या निधनाचं बद्दल सांगतानाच तो म्हणाला, “ती घरातील सर्वात हुशार महिला होती. ती एक उत्तम गायिका होती, अप्रतिम कूक होती आणि चार मुलांची एक खंबीर आई होती. तिने फक्त मुलांनाच नाही तर नातवंडांनाही मोठं केलं. तिने मला बर्याच गोष्टी शिकवल्या. जेव्हा मला करिअरी सुरुवात करायची होती. तेव्हा मला पाठिंबा देणारी ती एकमेव माझ्यासोबत होती. तिने आम्हाला कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवलं. ती माझ्यासोबत सदैव राहिल.” आजीच्या आठवणी सांगतानाच जितेंद्रेने आजींवर उपचार करणाऱ्या डाक्टरांचेदेखील आभार मानले.
यासोबतच जितेंद्रने आजीच्या आठवणीत एक कविता शेअर केली आहे.
View this post on Instagram
मुझसे बेहतर
मुझीको जाननेवाली
मेरे बचपन को
आज भी पहचानानेवाली
मैं भी कच्चा हुँ ये जान लेता हूँ
बच्चा हूँ आज भी मान लेता हूँ
उसकी रूह में कहानियों का जिन है
उसके साथ मेरे बीते हुए दिन हैं
उसके निवालों ने मेरी
जबान को ज़ायक़ा सिखाया
बहुओं को ससुराल में बैठे
उनका मायका दिखाया
उसकी छुअन में मशवरा है
बातों में दिया सलाई है
आंखों में फ़कीर की पुकार
मन्नत में सबकी भलाई है
किसीकी प्यारी बिटिया थी
जो मुझे अपनी बिटिया दे गई
माँ ने माँ को पैदा किया और
हमें साया दे गई
उसकी रगों में जीने का
जुनून बेइन्तेहाशा है
न जाने कबसे कितनी ही
पुश्तों को इसने तराशा है
इसके होने से जैसे खुदा
मेरे कऱीब सा लगता है
दिन से पहले शुरू हो जाती है
उसके बाद सूरज जगता है
जिसके अंदर ढेर सारा प्यार
और जिंदगी भरी बेशुमार है
हर घर में किरदार तो होते हैं कई
लेकिन एक ही रॉकस्टार है
जिसके बिना मेरा बचपन
मेरी पूरी जिंदगी बेमानी है
बाप है पूरी दुनिया की लेकिन
मेरे लिए मेरी नानी है।
-जितेंद्र जोशी
आजीच्या निधनाच्या दु:खातही जितेंद्रने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. “कृपा करून घरात रहा, मास्कचा वापरा, तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या.” जितेंद्रच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्याचं सांत्वन केलंय.