बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. जॉन अब्राहमने स्वत: या चित्रपटाच्या प्रदर्शनाची बदललेली तारीख जाहीर केली आहे. राज्यातील चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा समोर येत आहे. नुकतंच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

जॉन अब्राहमने स्वत: इन्स्टाग्रामवर एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. याद्वारे त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याचे जाहीर केले आहे. जॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये तो शर्टलेस असल्याचे पाहायला मिळत आहे. यात त्याने दोन जणांना हातावर उचलल्याचे दिसत आहे. यावेळी जॉन हा पोलिसांच्या वेशात दिसत आहे. तसेच त्याच्या मागे अनेक लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये अशोक चिन्हही पाहायला मिळत आहे.

हे मोशन पोस्टर शेअर करतेवेळी जॉन अब्राहमने कॅप्शन देतेवेळी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. “येत्या २५ नोव्हेंबरला ‘सत्यमेव जयते २’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटगृहात अॅक्शन आणि मनोरंजन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या २५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.” असे कॅप्शन जॉनने या पोस्टरला दिले आहे.

जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आता त्याची तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांना सत्यमेव जयते हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे.