दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे देशभरात चाहते आहेत. ज्युनियर एनटीआरला लक्झरी गाड्यांची आवड असून गेल्या काही दिवसांपासून ते त्याच्या लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल या लक्झरी कारमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ही शानदार आणि तितकीच महागडी कार खरेदी करणारा एनटीआर पहिला भारतीय ठरला आहे. या गाडीच्या किमतीची चर्चा रंगलेली असतानाच आता या कारच्या स्पेशल नंबर प्लेटसाठीदेखील एनटीआरने मोठी रक्कम मोजल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
ज्युनियर एनटीआरने त्याच्या लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल या लक्झरी कारच्या स्पेशल नंबर प्लेटसाठी तब्बल १७ लाख रुपये मोजले आहेत. अर्थातच नंबर प्लेटसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्याने हा नंबर काय आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. एनटीआरेन कारसाठी 9999 हा खास नंबर निवडला आहे. त्याच्या या लक्झरी कारचा नंबर TS 09 FS 9999 असा आहे.
“होय ते थोडं वेदनादायी होतं”, समांथापासून विभक्त होणाच्या चर्चांवर नागा चैतन्यने व्यक्त केल्या भावना
खेरताबाद आरटीओ ऑफिसमध्ये आयोजित एका समारंभात जुनियर एनटीआरने या फॅन्सी नंबरसाठी बोली लावली. यानंतर आरटीओकडून एनटीआरला हा नंहर देण्यात आला आहे. एनटीआरकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यातील बीएमडब्ल्यू 720 एलडी या गाडीचा नंबरदेखील 9999 असाच आहे. त्यामुळे एनटीआरसाठी हा नंबर लकी असल्याचं लक्षात येतंय.
ज्युनिअर एनटीआरने खरेदी केलेल्या लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूलची भारतातील एक्स शोरुम किंमत 3.16 कोटी असून त्याने या कारसाठी जवळपास ५ कोटी रुपये मोजल्याच्या चर्चा आहेत. ज्युनियर एनटीआरला गाड्यांची आवड आहे. काही वृत्तानुसार त्याच्याकडे पोर्श 718 केमॅन ही जवळपास दीड कोटी रुपयांची कार आहे. तसचं रेंज रोव्हर व्होग, मर्सिडीज-बेंझ जीएलएस 350 आणि बीएमडब्ल्यू 720 एलडी या महागड्या गाड्या त्याच्या ताफ्यात आहेत.