झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठीसोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. नुकतंच जुग जुग जियो या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट असलेली टीम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर पोहोचली आहे. याचा एक व्हिडीओ अभिनेता वरुण धवनने शेअर केला आहे.

‘जुग जुग जियो’ हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच या चित्रपटातील कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ स्वत: वरुण धवनने शेअर केला आहे. यामध्ये कियारा अडवाणी आणि अनिल कपूर दिसत आहेत.

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उलगडणार पद्मश्री सुधा मूर्तींचा जीवनप्रवास, प्रेक्षकांसाठी खास पर्वणी

तर स्टेजवर कुशल बद्रिके परफॉर्म करताना दिसत आहे. कुशलचा परफॉर्मन्स पाहून कियाराला हसू आवरणं शक्य होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ती हसून हसून लोटपोट होत असल्याचे दिसत आहे. वरुण धवनने हा व्हिडीओ शेअर करताना हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

“तुझ्या निधनाला आज २ वर्षे पूर्ण झालीत पण…”, सुशांत सिंहच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणीची भावूक पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल, टिस्का चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.