अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या त्याच्या ‘कांतारा’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्याला आता अनेक चित्रपटांची ऑफर येत आहेत. या चित्रपटात रिषभ शेट्टी आणि सप्तमी गौडा यांच्या जोडीलादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. रिषभने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दाक्षिणात्य अभिनेत्रींनबद्दल भाष्य केलं आहे.

गुलटे डॉट कॉमशी बोलताना रिषभ शेट्टीला विचारण्यात आले की ‘तुझ्या आगामी चित्रपटात समंथा प्रभु, रश्मिका मंदाना, कीर्ति सुरेश आणि साई पल्लवी या अभिनेत्रींनपैकी कोणती अभिनेत्री तुझ्या आगामी चित्रपटात असेल?’ त्यावर रिषभ म्हणाला की “मी माझ्या चित्रपटाची पटकथा लिहल्यावर मी कलाकार निवडतो. मी प्रामुख्याने नव्या कलाकारांबरोबर काम करतो कारण त्यांच्यामागे काही विशिष्ट नियम, बॅरियर नसतात. वरील अभिनेत्रींच्याबाबतीत तो पुढे म्हणाला मला असे अभिनेते आवडत नाही. पण मला साई पल्लवी आणि समंथा यांचे काम आवडते.”

“कतरिनाला माझ्यातील…”; विकी कौशलने खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा

दाक्षिणात्य अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. रश्मिका मंदानाने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. गुड बाय या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झळकली होती. तर समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यातील समंथाच्या कामाचे कौतूक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कांताराबद्दल बोलायचं तर अवघ्या १६ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ३०९ कोटी रुपयांची कमाई केला आहे. हा चित्रपट कन्नड भाषेत ३० सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. तर हिंदी, तमिळ आणि तेलुगू आणि मल्याळममध्ये १४ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ४७.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.