सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेता कमाल आर. खान याने प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

अवश्य पाहा – “मला सैराट २ मध्ये काम करायला आवडेल”; ‘आश्रम’ फेम अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे. “बॉलिवूड अभिनेत्रींच्या डोळ्यांचे फॅन असलेल्या चाहत्यांना मला प्रश्न विचारायचाय, तुम्हाला अभिनेत्रींच्या धुंद करणाऱ्या डोळ्यांचं रहस्य कळलं का?” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने अभिनेत्रींची खिल्ली उडवली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जरी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. या वृत्ताला एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. दीपिकाला २५, तर श्रद्धा आणि सारा यांना २६ सप्टेंबरला हजर राहण्याबाबत कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी अंमली पदार्थाचा संबंध आहे का? या मुद्दय़ासोबत हिंदी चित्रपटसृष्टी (बॉलीवूड) आणि अंमली पदार्थ या समीकरणाबाबतही तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamaal r khan bollywood drugs probe mppg
First published on: 24-09-2020 at 18:45 IST