बॉलीवूडचा वादग्रस्त चेहरा कमाल खान याने देशद्रोहाचा आरोप असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला दोन लाख रुपये भेट म्हणून देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील ट्विट कमाल खान याने आपल्या ट्विटर हॅण्डलवर केले आहे.
कमाल खान ट्विटमध्ये म्हणतो की, कन्हैया कुमारला मी त्याच्या दमदार भाषणासाठी दोन लाख रुपये भेट म्हणून देणार आहे. कोणीतरी माझ्या दिल्लीतील कार्यालयातून ते पैसे घ्यावेत. कन्हैयाचे भाषण हे नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ च्या तोडीचे आहे. मी याआधीही बोललो होतो की मोदींना विद्यार्थ्यांसोबतचे शत्रुत्व महागात पडेल. खरंतर कन्हैयाने मोदींचे आभार मानायला हवेतत. त्यांच्यामुळे तो एक रिअल लाईफ हिरो आणि भविष्यातील राजकारणी झाला आहे, असेही कमाल म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.