गेले काही दिवस हृतिकसोबतच्या वाक् युद्धामुळे कंगना बरीच चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत कंगनाचे फार कमी मित्रमैत्रीण आहेत. त्यामुळे कंगना ब-याचदा एकटी पडते. पण बॉलीवूडमधील एक अशी व्यक्ती आहे जिचा कंगनावर विश्वास असून, तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खान आहे.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात कंगना आणि आमिरचा भाचा इमरान खान यांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी चित्रपटाबाबत चर्चा करण्यासाठी आमिर आणि कंगनाची भेट झाली होती. कंगना आणि आमिर हे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे कंगनाने विश्वासाने आमिरला तिच्या आणि हृतिकच्या ब्रेकअपबद्दल सांगितले.  यावेळी कंगनाला तिचे अश्रू अनावर झाल्याने ती आमिरच्या खांद्यावर डोक ठेवून रडू लागली. तेव्हा, आमिरने तिला यातून बाहेर पडून हृतिकपासून अंतर राखण्यास सांगितले. इतकेच नाही तर कंगनाच्या काळजीपोटी आमिरने तिची बहिण रंगोली हिला तिच्यावर लक्ष ठेवण्यासही सांगितले.