एकेकाळी होतं वैर आता मात्र कौतुक; जाणून घ्या कंगना करण जोहरबद्दल काय म्हणाली ?

करण जोहरचं नाव जरी समोर आलं तरी कंगनाची आगपखाड होताना अनेकदा दिसून आली आहे. मात्र यंदा कंगनाने करण जोहरवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

kangana-ranaut-appreciating-karan-johar

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि दिग्गज फिल्ममेकर करण जोहर या दोघांमधला वादाचं नातं जगजाहीर आहे. एकीकडे कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिझम विरोधात शंख फुंकले, तर दुसरीकडे फिल्ममेकर करण जोहर जहजाहीरपणे नेपोटिझमला पाठिंबा देताना दिसून आला. इतकंच नव्हे तर दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांच्या विरोधात व्यक्त होत अनेक वाद देखील रंगले होते. केवळ करण जोहरचं नाव जरी समोर आलं तरी कंगनाची आगपखाड होताना अनेकदा दिसून आलं आहे. पण वातावरण थोडं बदलल्यासारखं झालंय. कारण एकेकाळी पक्कं वैर असलेली कंगना रणौत आता करण जोहरचं गुणगान गाताना दिसून आलीय.

अभिनेत्री कंगना रणौत आणि फिल्ममेकर करण जोहर यांच्यातील मतभेद हे त्यांच्या विचारसरणीमुळे होत असतात. पण जेव्हा केव्हा त्यांच्या कामाची गोष्ट येते त्या प्रत्येक वेळी एकमेकांचे प्रशंसक बनलेले दिसून येतात. नुकतंच तिने करण जोहरच्या कामाचं कौतुक केलंय. मात्र त्यांचं कौतुक करताना तिने त्याच्या नावाचा उल्लेख केला नाही.

अभिनेत्री कंगना रणौतने फिल्ममेकर करण जोहरच्या प्रोडक्शन हाउसमधून बनलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटाचं अगदी तोंडभरून कौतुक केलंय. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात तिने लिहिलंय, “नॅशनल हिरो विक्रम बत्रा पालमपुरमधले हिमाचली योद्धे आणि लोकप्रिय सैनिक होते. ज्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली त्यावेळी अगदी हिमाचलच्या जंगलात एका आगीसारखी पसरली. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. त्यावेळी मी लहान होती आणि या बातमीमुळे कितीतरी दिवस खूप त्रासात गेले.”

kangana-ranaut-karan-johar-shershah-film
(Photo: Instagram/
kanganaranaut)

कौतुक तर केलं पण नाव न घेता

कंगना रणौतने सुरूवातीला पहिल्या स्टोरीमधून विक्रम बत्रा आणि त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. पण दुसऱ्या स्टोरीमधून तिनं फिल्ममेकर करण जोहरवर स्तुतीसुमने उधळली. यात तिने लिहिलं, “सिद्धार्थ मल्होत्रा तू किती शानदार श्रद्धांजली अर्पिली आहेस…संपूर्ण टीमचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन…आणि तुम्ही सर्वांनी मिळून उत्तम परफॉर्मन्स दिलाय.” अभिनेत्री कंगनाने लिहिलेल्या या इन्स्टा स्टोरीमध्ये विशेष म्हणजे तिने करण जोहरचं कौतुक तर केलंय, पण त्याच्या नावाचा कुठेही उल्लेख मात्र केलेला नाही.

kangana-ranaut-on-karan-johar-shershah-film
(Photo: Instagram/
kanganaranaut)

 

‘शेरशाह’ हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रमच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थने विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर अभिनेत्री कियारा आडवाणीने चित्रपटात विक्रम बत्रा यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut appreciating karan johar movie shershaah on insta story the glory of capt vikram batra prp

ताज्या बातम्या